मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Nashik Lockdown : सॉरी सॉरी म्हणतच पळत सुटला, नाशिककरांनो, घराबाहेर पडू नका, पाहा हा VIDEO

Nashik Lockdown : सॉरी सॉरी म्हणतच पळत सुटला, नाशिककरांनो, घराबाहेर पडू नका, पाहा हा VIDEO

लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पण, तरीही...

लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पण, तरीही...

लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पण, तरीही...

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 13 मे : नाशिकमध्ये कोरोनाची (Nashik Corona cases) साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन (Nashik Lockdown)लावण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पण, तरीही काही महाभाग विनाकारण बाहेर फिरत आहे, अशा तरुणांना नाशिक पोलिसांनी (Nashik Police) चांगलाच प्रसाद दिला आहे.

नाशिकमधील कोरोनाची परिस्थिती पाहता 22 मेपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. पण, अशा परिस्थितीतही विनाकारण घराबाहेर पडण्याचे अजूनही प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस चांगलाच प्रसाद देत आहे.  रस्ता, चौक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, नागरी वस्ती,बाजारपेठेत या सगळ्याच ठिकाणी पोलीस आक्रमक झाले आहे.

अनेक दिवसांनंतर पोलीस आता रस्त्यावर उतरले आहे.  शहरातील 13 प्रमुख नाक्यावर पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

25 हजारात सुरू करा हा व्यवसाय,महिन्याला होईल 3 लाखांपर्यंत कमाई,सरकारही करेल मदत

लॉकडाऊनच्या काळात केवळ वैद्यकीय कारणांसाठीच बाहेर पडण्यास मुभा आहे. राज्य शासनाने 5 एप्रिलपासून निर्बंध लागू केले आहे.  त्यानुसार 22 एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू असणार आहे. परंतु रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. त्यामुळेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.

काय आहे नियमावली?

- सरकारी आस्थापना मात्र 15 टक्के उपस्थितीत राहणार सुरू

- सकाळी 7 ते दुपारी बारा वाजेपर्यंत भाजीपाला दुकानं राहणार सुरू

- किराणा दुकानातून होणार फक्त होम डिलिव्हरी, काउंटर सेल बंद

- जिल्ह्यातील 15 प्रमुख आणी 4 उप,अश्या 19 बाजारसमिती 10 दिवस राहणार बंद

- फक्त अत्यावश्य्क सुविधांचीच दुकाने खुली ठेवण्यास परवानगी

- सर्व प्रकारचे आठवडे बाजार देखील बंद

- वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही

- नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.

First published: