Home /News /nashik /

नाशकात Lockdownमध्ये पोलिसांची मिसळ पार्टी, अधिकाऱ्यांकडूनही कोरोना नियमांना हरताळ

नाशकात Lockdownमध्ये पोलिसांची मिसळ पार्टी, अधिकाऱ्यांकडूनही कोरोना नियमांना हरताळ

Nashik Police programme पोलिसांच्या बरोबरीनं कोरोनाच्या संकटात काही नागरिकही काम करत आहोत. विशेष पोलिस अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

    नाशिक, 22 मे : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात नागरिकांमध्ये शिस्त राहावी याची जबाबदारी पोलिसांवर (Police) आहे. नाशकात पोलिसांना त्यासाठी सुरू केलेल्या कारवाईचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. पण रविवारी समोर आलेल्या एका प्रकारानं नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत आहे. नाशिकमध्ये कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिसळ पार्टीच्या (Misal party) कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांची मात्र पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या संकट काळामध्य पोलीस दलातील कर्मचारी हे 24 तास कशाचीही पर्वा न करता काम करत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानिमित्त प्रशासनाच्या वतीनं पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि मिसळ पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलिसांच्या बरोबरीनं कोरोनाच्या संकटात काही नागरिकही काम करत आहोत. विशेष पोलिस अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात कोरोनाचे नियम पाळले गेले नसल्याचा आरोप होत आहे. (हे वाचा - Oxygen Express यंत्रणा हाताळताना दिसली Women Power! रेल्वे मंत्र्यांकडूनही कौतुक) विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. असं असूनही या कार्यक्रमात नियम पाळले गेले नसल्याचा आरोप होत आहे. पोलिस सामान्य नागरिकांना संचारबंदीत फिरताना दंडुक्याचा प्रसाद देत आहेत. तसंच कार्यक्रमात 20 पेक्षा अधिक लोकांना परवानगी देत नाही. मग पोलिसांच्या कार्यक्रमाला नियम नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (हे वाचा-गर्भवतीला कोरोना संसर्ग, व्हेंटिलेटवरचं सिजेरियन; बाळाला पाहताच डॉक्टर हैराण!) नाशिकमध्ये पोलिसांनी कोनोचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई केल्याचं पाहायला मिळालं होतं. दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे नागरिकांवर कारवाई करण्याचे काही व्हिडिओदेखिल समोर आले होते. पण आता नागरिकांना नियम शिकवणाऱ्या पोलिसांना कोण नियम शिकवणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. कोरोनाच्या काळात पोलिस अत्यंत जबाबदारीनं काम करत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक होण्यात काही गैर नाही. मात्र सामान्यांना नियम शिकवताना पोलिसांनीही ते पाळायला हवेत ही अपेक्षा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra police, Nashik

    पुढील बातम्या