नाशिक, 19 एप्रिल: नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी आणखी एक दणका दिला आहे. धार्मिक स्थळांवर (religious places) लावलेल्या भोंग्यांचे डेसीबल मोजण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. काल नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं. त्यानंतर आज पुन्हा आयुक्तांनी भोंग्यांसंदर्भात नवे आदेश काढले आहेत.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम भोंग्यांचा आवाज मोजणार आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिली जाणार असल्याचंही समजतंय.
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकारी एकत्रित धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबील मोजणार आहेत. नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तात्काळ दुरुस्त करून घेण्याचं आदेश पोलीस आयुक्तांनी प्रदूषण मंडळाला दिले आहेत.
पोलीस आयुक्तांनी काल दिलेला आदेश
भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.
नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. तसंच त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यात नमूद केलंय. इतकंच काय तर पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही दिला आहे.
10- 12 जणांच्या टोळीकडून वृतपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर
मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश दिला आहे. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार, असल्याचं त्यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.