Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेनंतर अजित पवारांनी दिले राज्यातील रुग्णालयांसाठी आदेश

Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेनंतर अजित पवारांनी दिले राज्यातील रुग्णालयांसाठी आदेश

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे

  • Share this:

मुंबई, दि. 21एप्रिल: नाशिकमध्ये पालिकेच्या (Nashik Municipal Corporation) झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जण दगावल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घटनेची दखल घेत राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचे व रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

लस घ्या आणि टोमॅटो मोफत मिळवा; जिल्हा प्रशासनाच्या ऑफरमुळे नागरिकांची गर्दी

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्कारुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिले.

यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत आज अंतिम निर्णय, CMच्या अध्यक्षतेखालील बैठक संपली

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 3:49 PM IST

ताज्या बातम्या