नाशिक, 30 मे: शनिवारपासून राज्याच्या (Maharashtra) विविध भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस (heavy rain) पडत असल्याचं पहायला मिळत आहे. वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे उन्मळून पडत आहेत तर कुठे विजेचे खांब पडत आहेत. तसेच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाशिकमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला (Onion damage due to heavy rain in Nashik). यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) May 30, 2021
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस रोज जोरदार हजेरी लावत आहे. आज येवला, देवळा यासह इतर काही भागात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील होता त्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका येवल्यात बसला असून येथे अनेक ठिकाणी कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले. त्यामुळे त्यात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांदा भिजून खराब झाला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
— News18Lokmat (@News18lokmat) May 30, 2021
Monsoon Updates: केरळात मान्सूनचं आगमन लांबणीवर; 24 तासांत पुण्यासह मुंबईत पूर्वमोसमी पावसाचा इशारा
चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
30 मे 2021
कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता
31 मे 2021
कोकण - तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता
1 जून 2021
कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

2 जून 2021

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Nashik, Onion, Rain