मराठी बातम्या /बातम्या /nashik /

नाशिकमध्ये भाजपा-शिवसेना संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी घेतली आयुक्तांची भेट

नाशिकमध्ये भाजपा-शिवसेना संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी घेतली आयुक्तांची भेट

नाशिकमध्ये भाजपाचे कार्यालयावर दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा भाजपचा आरोप आहे.हे प्रकरण सध्या धुमसत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नाशिक, 28 ऑगस्ट : नाशिकमध्ये भाजपाचे कार्यालयावर  दगडफेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा भाजपचा आरोप आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा सध्या भाजपकडून शोध घेतला जात आहे. हे प्रकरण सध्या धुमसत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

आयुक्तांची प्रशंसा

भाजपा कार्यालयावर दगडफेक करणारे शिवसैेनिक शुक्रवारी मुंबईत संजय राऊत यांच्यासोबत दिसल्यानं भाजपा पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईला रवाना झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन आयुक्तांची भेट घेतल्यानं याला विशेष महत्त्व आहे.

'पांडे हे चांगले अधिकारी आहेत. ते कायद्याशी तडजोड करत नाहीत, असा माझा अनुभव आहे. मला अशा अधिकाऱ्यांना भेटायला आवडते', या शब्दात राऊत यांनी यावेळी पांडे यांची प्रशंसा केली आहे.

नाशिकमध्ये भाजपचा मोठा नेता शिवसेनेच्या गळाला, माजी उपमहापौर करणार पक्षप्रवेश?

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी निदर्शने सुद्धा करण्यात येत आहेत. त्याच दरम्यान नाशकातील भाजपच्या कार्यलावर दगडफेक करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला होता.

First published:

Tags: Nashik, Sanjay raut