Home /News /nashik /

Nashik: पाण्याने भरलेल्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik: पाण्याने भरलेल्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी नाशकातील घटना

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी नाशकातील घटना

Nashik News: बाथरूममधील पाण्याच्या बादलीत पडल्याने एका सहा महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिकमधील बंदावणे मळा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 13 एप्रिल : नाशिक (Nashik)मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू (6 month old child drowned in bucket) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील बंदावणे मळा परिसरात ही घटना घडली आहे. बाथरूममधील पाण्याच्या बादलीत पडून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या बंदावणे मळा परिसरात राहणाऱ्या भिकाजयसिंग यांचा लहान मुलगा श्रीरीश हा सकाळी उठल्यानंतर घरातील खोलीत असलेल्या बाथरुममध्ये गेला. त्यावेळी तो पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बादलीत पडला. पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने अवघ्या काही क्षणांतच या बाळाचा मृत्यू झाला. काही वेळाने घरातील लोकांना हा प्रकार समजला असता त्यांनी अत्यवस्थ अवस्थेत श्रीरिशला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा : मुलीला कुत्रा चावल्याने संतप्त महिलेने कुत्र्याच्या पिल्लांचा घेतला जीव, पुण्यातील घटना कॅमेऱ्यात कैद भिवंडीत घडली होती अशीच घटना जानेवारी महिन्यात भिवंडीत अशीच एक घटना घडली होती. भिवंडीत दुर्देवी घटना घडली होती. पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मीत मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. दिलकैश अन्सारी असे मृत्यू झालेल्या बाळाचं नाव आहे. भिवंडी शहरातील देव नगर परिसरात ही घटना घडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी घरातील एक वर्षाचा चिमुकला खेळता खेळता बाथरूममध्ये गेला. बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक चिमुरडा हा भिवंडीतील देवनगर भागातील एका घरात कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी मृत चिमुकल्याची आई किचनमध्ये जेवण बनवत होती. तर त्यांची इतर मुले घरात हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. त्यावेळी खेळता खेळता चिमुरडा बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला आणि त्यातच या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bhiwandi, Nashik

    पुढील बातम्या