नाशिकमध्ये भाजपचा मोठा नेता शिवसेनेच्या गळाला, माजी उपमहापौर करणार पक्षप्रवेश?

नाशिकमध्ये भाजपचा मोठा नेता शिवसेनेच्या गळाला, माजी उपमहापौर करणार पक्षप्रवेश?

नाशिकच्या राजकारणात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. नाशिकचे भाजपचे माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आहे.

  • Share this:

लक्ष्णण घाटोळ, नाशिक, 28 ऑगस्ट: नाशिकच्या राजकारणात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. नाशिकचे भाजपचे माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की नाशिकचे भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सध्या शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान प्रथमेश गीते यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे. भाजपमध्ये गळचेपी होत असून बोलू दिल जात नसल्याचा आरोप केला जात आहे, परिणामी गीते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. दरम्यान अद्याप पक्षप्रवेशाची तारीख निश्चित नाही आहे. प्रथमेश गीते हे माजी आमदार वसंत गीते यांचे सुपूत्र आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली नसली तरी भाजमध्ये ते नाराज आहेत हे निश्चत आहे.

हे वाचा-Video: कवडीमोल भाव, नाराज शेतकऱ्यांनी क्रेट्सनं भरलेले टोमॅटो फेकले रस्त्यावर

नाशिकमध्ये सर्व पक्षांची मोर्चेबांधणी

नाशिकमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. महानगरप्रमुख पदाची जबाबदारी बडगुजर यांच्याकडे आहे. त्यांनी ही सूत्र हाती घेतल्यानंतर पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झाला आहे. बडगुजर संजय राऊत यांचे विश्वासू आहेत. दरम्यान आता राऊत यांनी प्रथमेश गीते यांची भेट घेतल्याने भाजपचा एक मोठा नेता शिवेसेनेच्या वाटेवर आहे. गीते यांनी नाशिकचे उपमहापौरपद भूषवलं होतं.

हे वाचा-भाजप Vs सेना वाद शिगेला, सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी देखील पुन्हा भाजपत प्रवेश केला आहे. त्यांच्या घरवापसीने भाजप-शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भाजपचे बडे नेते शिवसेनेत गेले आहेत. यामध्ये सुनील बागुल, वसंत गीते या मोठ्या नावांचा समावेश आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 28, 2021, 11:16 AM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या