मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिक जिल्हा ठरतोय Mucormycosis चा हॉटस्पॉट

नाशिक जिल्हा ठरतोय Mucormycosis चा हॉटस्पॉट

नाशिक (Nashik) जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत चालला आहे. दिवसेंदिवस म्युकरमायकोसिस ( Mucormycosis)चे रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसतेय.

नाशिक, 28 मे: नाशिक (Nashik) जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत चालला आहे. दिवसेंदिवस म्युकरमायकोसिस ( Mucormycosis)चे रुग्णांची संख्येत वाढ होताना दिसतेय. तसंच कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. म्युकरमायकोसिसमुळे होणाऱ्या मृतांचा आकडाही वाढतोय. त्यामुळे कोरोनामुळे कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था म्युकरमायकोसिसचा सामना कसा करणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

आतापर्यंत म्युकरमायकोसिसमुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव आणि नाशिक शहरामध्ये म्युकरमायकोसिसमुळे बळी गेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता अधिकच सजग झाली आहे. पोस्ट कोविड रुग्णानांही म्युकरमायकोसिसचा धोका अधिक आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 316 जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. त्यापैकी 68 रुग्ण बरे झाले तर 248 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यातील 204 खासगी रुग्णालयात तर 26 जणांवर अधिग्रहित कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. 14 रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा- चंद्रपूर जिल्ह्यात 'अशी' लागू झाली होती दारुबंदी, वाचा सविस्तर

दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या उपचारात महत्त्वाचे असणारे अ‍ॅम्फोरेटेसीन बी इंजेक्शनचाही जिल्ह्यात अपुरा साठा आहे. जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. तसंच तुटवड्यामुळे महागड्या दरात इजेक्शनची विक्री होत असल्याच्या तक्रारी समो आल्या आहेत. इंजेक्शनच्या मागणीत आणि पुरवठ्यात मोठी तफावत असल्याचं समजतंय.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Nashik