सीमेवर लढताना पतीला वीरमरण, सैन्यात भरती होऊन बदला घेणार वीरपत्नी; Indian Idol मध्ये मांडली कहाणी

सीमेवर लढताना पतीला वीरमरण, सैन्यात भरती होऊन बदला घेणार वीरपत्नी; Indian Idol मध्ये मांडली कहाणी

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांचेही धैर्य मोठे असते. त्यांच्या या धैर्य आणि जिद्दीमुळेच आपण आपल्या सामान्य जीवनात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत.

  • Share this:

नाशिक, 15 ऑगस्ट: आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2021) उत्साह आहे. आज भारत देश 75 वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करत आहे. दरम्यान भारताला मिळालेलं हे स्वातंत्र्य सहज-सोपं नव्हतं, अनेक हुतात्म्यांनी प्राणांची आहूती दिली तेव्हा दीडशे वर्षांच्या लढाईनंतर आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो. दरम्यान स्वातंत्र्यानंतरही वर्दीतील पोलीस अधिकारी म्हणा किंवा सीमेवर लढणारे जवान म्हणा, देशासाठी प्राण ओवाळून टाकण्यास तयार असतात. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांचेही धैर्य मोठे असते. त्यांच्या या धैर्य आणि जिद्दीमुळेच आपण आपल्या सामान्य जीवनात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. ही कहाणी देखील अशाच एका वीरपत्नीची आहे. नाशिकमधील यशोदा गोसावी यांची कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे.

11 नोव्हेंबर 2018 साली पाकिस्तान लष्कराच्या गोळीबारात जवान केशव गोसावी यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा गोसावी आणि मुलगी काव्या असा परिवार आहे. काव्याचा जन्म तर शहीद केशव यांना वीरमरण आल्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी झाला होता. पतीच्या निधनानंतर यशोदा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण ती वीरपत्नी होती, त्या डगमगल्या नाहीत पण याउलट धैर्याने उभं राहिल्या आणि एखाद्या सैनिकी कुटुंबातील स्त्रीला शोभेल असा निर्णय घेतला. यशोदा यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय (Nashik Martyr Keshav Gosavi Wife Yashoda Gosavi will join the Indian Army) घेतला आहे. केवळ सैन्यात भरती नाही तर पतीवर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे. 11 नोव्हेंबर 2018 रोजी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधींचे उल्लंघन केले होते, त्यावेळी झालेल्या गोळीबारात सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावचे सुपुत्र केशव गोसावी यांना वीरमरण आले होते.

हे वाचा-आतंकवादी बुरहान वाणीच्या वडिलांनी काश्मीरात फडकावला तिरंगा, पाहा EXCLUSIVE फोटो

इंडियन आयडल (Indian Idol) या कार्यक्रमात यशोदा यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी शहीद केशव यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि सैन्यात भरती होऊन बदला घेण्याचा दृढ निश्चय सांगितलां. त्या दिवसाची आठवण सांगताना यशोदा भावुक झाल्या होत्या. ज्या दिवशी शहीद केशव यांनी दुश्मनाच्या गोळ्या झेलल्या त्यादिवशी काही तास आधी यशोदा आणि केशव यांचे फोनवरुन बोलणे झाले होते. यशोदा नऊ महिन्यांच्या गर्भवती असल्याने काही दिवसातच त्यांच्या घरी खूशखबर येणार होती. त्यामुळे केशव यांनी त्यांना लाडू बनवण्यास सांगितले होते. नऊ महिन्यांची गर्भवती असूनही त्यांनी कसेबसे लाडू तयार केले. संध्याकाळी त्यांना केशव यांच्या यूनिटमधून फोन आला, तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्यांना शेजारी कुणी असेल तर त्यांस फोन देण्याचे सांगतले. समोरून बातमी आली ती केशव यांच्या निधनाची. जेव्हा त्यांना केशव यांना वीरमरण आल्याचे समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

हे वाचा-15 ऑगस्टपूर्वी मोठा दहशतवादी कट उधळला, जैशच्या 4 अतिरेक्यांना अटक

आता त्यांची काव्या गोसावी दोन वर्षांची झाली आहे. या माऊलीने धीर न सोडता सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. देशसेवा आणि पतीवर असणारे निस्सिम प्रेम याकरता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 15, 2021, 1:40 PM IST

ताज्या बातम्या