Home /News /nashik /

Train derailed in Nashik: नाशिकमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; पवन एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले, अनेक प्रवासी जखमी

Train derailed in Nashik: नाशिकमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; पवन एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले, अनेक प्रवासी जखमी

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरुन घसरले

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरुन घसरले

Express derailed in Nashik: नाशिकमध्ये एक्सप्रेस ट्रेनचे डबे रुळावरुन घसरले आहेत.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 3 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील लहवीत ते देवळाली दरम्यान एलटीटी-जयनगर (पवन) एक्सप्रेसला अपघात (LTT Jaynagar express train derailed) झाला आहे. पवन एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या हलवीत स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. (Coaches of 11061 LTT-Jaynagar Express have been derailed between Lahavit and Devlali near Nashik) अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वेचे डबे रुळावरुन खाली घसरल्याने रेल्वेतील प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या वेगाने मदत आणि बचावकार्य सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघाताचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, रुळ तुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. भुसावळ रेल्वे मंडळ अधिकारी नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत. या अपघाताच्या संदर्भात मध्य रेल्वेने ट्विट करुन माहिती दिली की, दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास 11061 एलटीटी-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरले आहेत. हलवीत ते देवळाली (नाशिकजवळ) दरम्यान डाऊन मार्गावर हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातानंतर मध्यरेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. सीएसएमटी स्टेशनच्या टीसी कार्यालय - 55993 आणि एमटीएनएल 02222694040  हे हेल्पलाईन नंबर रेल्वेकडून जारी करण्यात आले आहेत. या रेल्वे अपघातानंतर काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मध्यरेल्वेकडून देण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये 'द बर्निंग ट्रेन' जानेवारी महिन्यात गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग (Gandhidham Puri Express catches fire) लागली होती. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून (Nandurbar Railway Station) काही अंतरावर ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी तात्काळ गाडीतून बाहेर पडले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Nashik, Train, Train accident

    पुढील बातम्या