नाशिकमधील Remdesivir मालेगावकरांना, दादा भुसेंच्या 'रुद्रावतारा'नंतर नाशिककरांमध्ये संताप

नाशिकमधील Remdesivir मालेगावकरांना, दादा भुसेंच्या 'रुद्रावतारा'नंतर नाशिककरांमध्ये संताप

नाशिक शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनची तुटवडा जाणवत असताना, कृषीमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या FDA कार्यालयात ठाण मांडून येथील 94 रेमडेसिवीर मालेगावकरांसाठी नेले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये प्रशासनाचा सुरू असलेला सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

मालेगाव, 13 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना स्थिती (Corona pandemic) बिकट बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता नाशिकमध्येही कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतं आहे. परिणामी येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेडची कमतरता (lack of bed) जाणवत आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir injection black market) काळाबाजारही वाढला आहे. एकिकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची तुटवडा जाणवत असताना, कृषीमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या FDA कार्यालयात ठाण मांडून येथील 94 रेमडेसिवीर मालेगावकरांसाठी नेले आहेत.

मालेगावही कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट बनत चाललं आहे. याठिकाणीही मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कृषीमंत्री दादा भुसे यांनी थेट नाशिक FDA कार्यालयात धडक मारली आहे. याठिकाणी त्यांनी ठाण मांडून 94 रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवले आहेत. नाशिक शहरात वितरणासाठी आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन अशाप्रकारे मालेगावला घेऊन गेल्यानं शहरातील रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

(हे वाचा-21 दिवसाच्या अंतरानं दिले जाणार Sputnik V चे 2 डोस, जाणून घ्या किती आहे प्रभावी?)

याठिकाणी पूर्णवेळ पालिका आयुक्त नसल्याने प्रशासनात ढिसाळपणा आणि गदारोळ होताना दिसत आहे. त्यामुळे शहरासोबतच जिल्ह्यात आरोग्य सेवेचं वितरण असमान पद्धतीनं होतं आहे. त्यामुळे नाशिक आरोग्य यंत्रणा पुर्णपणे कोलमडताना दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणेतील या गोंधळाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. परिणामी गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वंचित राहावं लागत आहे.

दरम्यान मालेगावमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध झाल्याने त्याठिकाणी दिलासा व्यक्त केला जातो आहे. अशी माहिती समोर येते आहे की मालेगावला 400 रेमडीसिव्हर इंजेक्शन मिळाले आहेत. भुसे यांनी सामान्य रुग्णालय, महानगरपालिकेचे कोव्हिड हॉस्पीटल तसेच शहरातील कोव्हीड हॉस्पिटल यांना दिले 400 रेमडीसीवीर दिले आहेत. इंजेक्शन मिळाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळाला मोठा दिलासा

(हे वाचा-भाजपकडून राज्याला 50 हजार remdesivir injection देण्याची घोषणा)

त्याचबरोबर खाजगी आणि शासकीय रुग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार वाढला आहे. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दराने विकलं जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून हवी तेवढी रक्कम उकळण्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहे. त्यामुळे याचा मोठा आर्थिक भुर्दंड नातेवाईकांना सोसावा लागत आहे. सोबतचं मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 2:56 PM IST

ताज्या बातम्या