Home /News /nashik /

नाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल, एकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप

नाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल, एकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप

नाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल

नाशिकच्या माजी महापौरांच्या पुत्राविरोधात गुन्हा दाखल

Nashik ex mayor son booked: नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 8 सप्टेंबर : मनसेचे नाशकातील ज्येष्ठ नेते अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या मुलाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल मुर्तडक याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याच्या आरोपांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशकातील पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Case registered against Nashik ex mayor son) नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा मुलगा विशाल मुर्तडक (Vishal Murtadak) याच्यावर एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. गणपती स्टॉल्स चालकांकडून पैसे घेतो असं म्हणत विशाल मुर्तडक याने हेमंत आहेर नावाच्या व्यक्तीला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत हेमंतच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. ... म्हणून मी शरद पवारांच्या विरोधात बोलतो, गोपीचंद पडळकरांनी पहिल्यांदाच सांगितलं आक्रमक टीका करण्यामागचं कारण मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात गणपती स्टॉल धारकांकडून पैसे मागितल्याचं म्हणत हेमंत आहेर नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात संशयित असलेल्या विशाल अशोक मुर्तडक याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल हा नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा मुलगा आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप अशोक मुर्तडक किंवा त्यांचा मुलगा विशाल मुर्तडक यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
    First published:

    पुढील बातम्या