मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर; दिरंगाई प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक सक्तीच्या रजेवर

नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर; दिरंगाई प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक सक्तीच्या रजेवर

Nashik coronavirus situation : जिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या 80 व्हेंटीलेटरपैकी 73 व्हेंटिलेटर हे वापरातच नसल्याची माहिती समोर आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ संतापले.

Nashik coronavirus situation : जिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या 80 व्हेंटीलेटरपैकी 73 व्हेंटिलेटर हे वापरातच नसल्याची माहिती समोर आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ संतापले.

Nashik coronavirus situation : जिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या 80 व्हेंटीलेटरपैकी 73 व्हेंटिलेटर हे वापरातच नसल्याची माहिती समोर आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ संतापले.

नाशिक, 2 एप्रिल : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोनासंदर्भातील आढावा बैठक पार पडली. कोरोनाचं वाढत जाणारं संकट सर्वांनी मिळून परतवून लावणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तसंच कोरोनासंदर्भातील विविध क्षेत्रातील आढावा घेऊन संबंधित सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. दरम्यान, कोरोनासंदर्भात उपययोजना करताना दिरंगाई केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे.

वाचा -काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांकडे मांडली भूमिका

नाशिकमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था चोख ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना कोरोनाच्या अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. मात्र त्याचवेळी जिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या 80 व्हेंटीलेटरपैकी 73 व्हेंटिलेटर हे वापरातच नसल्याची माहिती समोर आली. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तसंच याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली.

टीव्ही 9 च्या वृत्तानुसार या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य आणि कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आलेले अपयश यामुळं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

वाचा - कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची तयारी सुरू, किती दिवसांनी घ्यावी लागणार?

भुजबळ म्हणाले, 'करुन दाखवण्याची वेळ'

कोरोनाचे संकट हे एक आव्हान असून ते गेल्या वर्षभरापासून आपल्यासमोर येवून ठाकले आहे; आता झुंज रूप बदलणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आहे,अशक्य ते शक्य करून दाखविण्याची हीच वेळ आहे, अत्यंत सावधानपणे हातात हात घालून काम करावे लागणार आहे, असं भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये बुधवारीच एका कोरोनाग्रस्त रुग्णानं बेड न मिळाल्यानं महापालिका आवारात थेट ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बसत आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्या रुग्णाला बिटो रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चाही झाली होती.

First published:

Tags: Corona, Nashik