Home /News /nashik /

Nashik : मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा राडा, बांधकाम व्यवसायिकाला शिवीगाळ करत मारहाण, VIDEO VIRAL

Nashik : मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा राडा, बांधकाम व्यवसायिकाला शिवीगाळ करत मारहाण, VIDEO VIRAL

मनसे महिला पदाधिकाऱ्यांची बांधकाम व्यवसायिकाला शिवीगाळ अन् मारहाण, नाशकातील VIDEO VIRAL

मनसे महिला पदाधिकाऱ्यांची बांधकाम व्यवसायिकाला शिवीगाळ अन् मारहाण, नाशकातील VIDEO VIRAL

बांधकाम साईटवर सुपरवायझर असलेल्या तरुणाला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने मारहाण केली आहे. ही घटना नाशिकमध्ये घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 11 जानेवारी : नाशिकमध्ये एका बांधकाम व्यवसायिकाला (Nashik building supervisor beaten) मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याची शिवराळ भाषेचा वापर करत मारहाण केली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यवासायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. (building supervisor beaten by mns women activist in Nashik) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयेश नावाचा हा इसम नाशिकमधील पंचवटी परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. त्याांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बांधकाम साईटवरील धूळ आणि काही कचरा शेजारील निवासींच्या घराजवळ पडला होता. या गोष्टीचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या तरुणाने आणि मनसेच्या महिला पदाधिकारीने घटनास्थळावर येत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच मारहाण सुद्धा केली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात ही घटना शूट केली. या घटनेचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांत धाव घेत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी कलम 323, 504, 506 नुसार तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे. जमिनीच्या वादातून तुफान मारामारी नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी तुफान हाणामारी झाल्याचं पाहयला मिळालं. जमिनीच्या वादावरून दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. यात महिला आणि वृद्धांना बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर फाटा परिसरात ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. आज या वादातून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले. ही संपूर्ण घटना यात घरातील मुलाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध इसमासह माहिलांना जबर मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Nashik, Video viral

    पुढील बातम्या