इतिहासाच्या गाभाऱ्यात दडली आहेत अनेक आश्चर्य, नाशिकच्या पांडवलेणीत सापडल्या 2500 वर्षांपूर्वीच्या आणखी 3 गुंफा

इतिहासाच्या गाभाऱ्यात दडली आहेत अनेक आश्चर्य, नाशिकच्या पांडवलेणीत सापडल्या 2500 वर्षांपूर्वीच्या आणखी 3 गुंफा

निसर्गानं भरभरून दान दिलेली भूमी म्हणजे नाशिक... येथील आल्हाददायक वातावरण, भरपूर ऑक्सिजन असलेली शुद्ध हवा, मुबलक पाणी, हिरवाईनं नटलेला विलोभनीय रूप.

  • Share this:

नाशिक, 15 जून: नाशिकच्या (Nashik) प्रसिद्ध पांडवलेणीच्या (Pandavleni) 25 लेण्यांत आता अजून 3 लेण्यांचा (3 more caves found) शोध लागल्यानं आता संख्या 28 झाली आहे. या गुंफा पांडवलेणी नावानं परिचित असल्या तरी तब्बल 2500 वर्षपूर्व, बुद्धकालीन इतिहास जीवंत करणारा अमूल्य ठेवा मानला जातो. सातवाहन, क्षात्रव आणि अभिर ... या एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या 3 राजघराण्यांच्या 500 वर्ष कालावधीत या लेणी कोरण्यात आल्या आहेत. खरं तर त्रिरेशमी (Trirashmi) नावानं यांची ओळख असल्याचं, आपला इतिहास सांगतो.

काय आहे नेमकी या लेण्यांची कहाणी ? सातवाहन साम्राज्य आणि या लेणी यांचा नेमका काय आहे संबंध ? क्षात्रप आणि सातवाहन या राजघराण्यांच्या संघर्षाच्या या लेण्या, कश्या आहेत साक्षीदार ? रामायणकालीन भूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकलाच हा इसवीसन पूर्व ठेवा, अजून कोणता इतिहास सांगतो? तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी, नाशिकच्या या भागाची गोवर्धन म्हणून ओळख होती, काय आहे यामागील इतिहास ? न्यूज 18 लोकमतनं नेमका या सर्व गोष्टींचा शोध सुरू केला आणी इतिहासाच्या उदरात लपलेल्या अनेक गोष्टी समोर आल्या. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, याचा हा खास रिपोर्ट.

निसर्गानं भरभरून दान दिलेली भूमी म्हणजे नाशिक... येथील आल्हाददायक वातावरण, भरपूर ऑक्सिजन असलेली शुद्ध हवा, मुबलक पाणी, हिरवाईनं नटलेला विलोभनीय रूप. नाशिक शहराला 9 पर्वत शिखरांनी वेढलं आहे. यातीलच हे एक शिखर आपण पांडवलेणी म्हणून ओळखतो. मुंबईहून, नाशिकला येतांना, अक्षरशः पाहरेदारच्या रुपात असलेला हा पर्वत, हिरवेगार असला तरी याच पर्वतावर, काळ्या कातळात कोरलेल्या या त्रिरेशमी अर्थात पांडवलेणी, इसवी सनपूर्वचा इतिहास जीवंत करतात. आजच्या प्रगत युगातही ही चढण इतकी सोपी नाही. दुतर्फा असलेलं जंगल, काही ठिकाणी पायवाट तर काही काही ठिकाणी असलेल्या या पायऱ्या, चालतांना, दूरवरून कानावर येणारी पक्ष्यांची गुंजारव तर कधी मोरांची केकावली. समुद्रसपाटीपासून, तब्बल 1700 मीटर उंचीवर असलेला हा प्रवास, अवघड असला तरी निसर्गाच्या साथीनं उत्साहवर्धक होता. जागोजागी केंद्रीय पुरातत्व खात्यानं लावलेले फलक, वेगवेगळी माहिती सांगत होते.

Ashadi Wari: आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर; पाहा काय आहेत नियम

दुर्मीळ वनौषधीचं आगार असलेला हा पर्वत चढून अखेर माथा गाठला आणि समोरच पूरातन इतिहासाचा जागर करणारा हा अमूल्य ठेवा खुला झाला. इथं पोचल्या पोचल्या एक गोष्ट अत्यंत ठळकपणे स्पष्ट झाली होती की या लेण्यांचं नाव जरी पांडवलेणी असलं तरी पांडवांचा, या लेण्यांशी काहीच संबंध नाही. बुद्धकालीन संस्कार, संस्कृती यांचा सुरेख मिलाप असणाऱ्या या लेणी जरी इसविसनपूर्व 500 वर्षांपूर्वीच्या असल्या तरी काळाच्या प्रवासात, सातव्या शतकात या गडप झाल्या. तब्बल 11 शतकं या प्राचीन लेणी, या कातळाच्या पहाडात बंदिस्त झाल्या होत्या. 1823 साली ब्रिटिश सैन्यातील, गिर्यारोहणची आवड असलेल्या कॅप्टन जेम्स डेलमाईन याला या लेण्यांचा शोध लागला आणि तेव्हापासून हा ठेवा आपल्याला खुला झाला.

बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या दगडात कोरलेल्या एकसंध मूर्त्या या अग्रभागी असलेल्या लेण्यात आहे. हा संपूर्ण प्रदेश सातवाहन राजांच्या अधिपत्याखाली होता. ग्रीस, इराण या देशातून आलेल्या क्षत्रापांनी युद्ध करून हा संपूर्ण भाग, सातवाहनांकडून हिरावला. पाली, प्राकृत भाषेतील शिलालेख हा इतिहास सांगतात. इसविसनपूर्व 200 वर्षापर्यंत सातवाहन साम्राज्य चांगलंच जेरिस आलं आणि अश्यातच सातवाहन राजघण्याची धुरा ही युवा राजा सातकर्णीकडे आली. चतुरस्त्र,युद्धनीती निपुण सातकर्णीनं ध्यास घेतला आणि सुरू झालं घनघोर युद्ध, अखेर क्षत्रापांचा लाजीरवाणा पराभव झाला. असं म्हणतात की इतकं घनघोर युद्ध झालं नव्हतं. याची माहिती असणारे, पाली भाषेतील तत्कालीन शिलालेख आजही जीवंत आहे. याच लेण्यात पाच पांडवसदृश्य मुर्त्या असल्यानं, या लेण्यांना पांडवलेणी म्हणून प्रचलीत नाव पडलं असलं तरी या आहेत त्रिरेशमी मालिकेतील लेण्या आपल्या देशात 1200 प्राचीन बुद्धलेण्या आहेत. यातील 680 लेण्या या महाराष्ट्रात आहेत.

84 ऐवजी 28 दिवसांनी घेऊ शकता कोरोना लशीचा दुसरा डोस; 'या' मुंबईकरांना BMC नी दिली मुभा

सम्राट अशोक काळातील मूळ प्राचीन लेणी आधारावर, या लेण्यांची रचना असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. बोधिसत्व पदमपाणी, बोधिसत्व वज्रपाणी यांच्या अप्रतिम मूर्ती, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भिक्षुंची साधनागृह, तत्कालीन वीरांच्या मूर्ती, महिलांची आभूषणे. हे इतिहास जीवंत करतात. सातवाहन, क्षत्राप यासह काही काळ सत्ता असलेल्या अभिर. या तिन्ही राजघराण्यातील एकच समान धागा म्हणून या त्रिरेशमी लेण्यातील, अनेक लेण्या आजही साक्षीदार आहेत. याच पार्वताच्या माथ्यावर,या मालिकेतील 3 लेण्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सापडल्या. तेथील वाट बिकट असल्यानं आज माथ्यावर जाता येत नसलं तरी लवकरच हाही मार्ग खुला होईल अशी प्रमाणिक इच्छा आज प्रत्येकाची नक्कीच आहे .काळाच्या उदरात गडप झालेले अनेक पुरातन ठेवा आज आपल्या देशात जागोजागी आहेत. त्याचं संवर्धन करण्यात, आपण कमी पडतोय हेच खरं.

First published: June 15, 2021, 7:29 PM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या