मराठी बातम्या /बातम्या /nashik /मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल, नारायण राणेंना अटक होणार?

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल, नारायण राणेंना अटक होणार?

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

'नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातही अनेक अनधिकृत CRZ कायद्याचं उल्लंघन करून बांधलेली बांधकामं आणि बंगले आहेत. ते आम्ही किरीट सोमय्या यांना दाखवू'

Case Registered against Narayan Rane over his remarks against CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्रयांवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली.

नाशिक, 24 ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) जन आशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad Yatra) दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी नाशिक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Case registered against Narayan Rane) करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिकातील सायबर पोलिसांत (Nashik Cyber Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसह या मुद्द्यांवर होणार चर्चा; पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली. शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशकात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांची एक टीम सिंधुदुर्गाकडे रवाना झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे.

अटक होणार?

"या गुन्ह्यात आरोपी भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचे विरोधात विधान केलेले आहे. गुन्ह्याची गंभीरता व्यापकता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने, एक पोलीस उप आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. संजय बारकुंड पोलीस उप आयुक्त नाशिक शहर यांनी एक टीम तरयार करुन मंत्री महोदय नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी" असं नाशिक पोलिसांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Narayan rane