मराठी बातम्या /बातम्या /nashik /सकाळी आईनं तर सायंकाळी वडिलांनी संपवलं जीवन; एकाच दिवशी भावंड अनाथ, नाशकातील हृदयद्रावक घटना

सकाळी आईनं तर सायंकाळी वडिलांनी संपवलं जीवन; एकाच दिवशी भावंड अनाथ, नाशकातील हृदयद्रावक घटना

Suicide in Nashik: पत्नीनं सकाळी आत्महत्या केल्यानंतर, पत्नीकडील नातेवाईक मारहाण करतील, या भीतीनं तरुणानं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं होतं. पण रात्री उशीरा त्यानंही पोलीस ठाण्यातच गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

Suicide in Nashik: पत्नीनं सकाळी आत्महत्या केल्यानंतर, पत्नीकडील नातेवाईक मारहाण करतील, या भीतीनं तरुणानं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं होतं. पण रात्री उशीरा त्यानंही पोलीस ठाण्यातच गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

Suicide in Nashik: पत्नीनं सकाळी आत्महत्या केल्यानंतर, पत्नीकडील नातेवाईक मारहाण करतील, या भीतीनं तरुणानं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं होतं. पण रात्री उशीरा त्यानंही पोलीस ठाण्यातच गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे.

सटाणा, 10 जुलै: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नामपूर याठिकाणी एका तरुणानं पोलीस ठाण्यातच (Police Station) गळफास घेऊन आत्महत्या (Man commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीनं सकाळी आत्महत्या केल्यानंतर, पत्नीकडील नातेवाईक मारहाण करतील, या भीतीनं तरुणानं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं होतं. पण रात्री उशीरा त्यानं पोलीस ठाण्यातच गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. त्यामुळे दोन चिमुकल्या भावंडाचं एकाचं दिवशी मायेचं छत्र हरवलं आहे. त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली आहे.

राजनंदिनी प्रकाश निकम असं आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे. राजनंदिनी यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येमुळे आपल्याला पत्नीचे नातेवाईक मारहाण करतील, या भीतीनं विवाहितेचा पती प्रकाश भीमराव निकम यानं स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. तसेच त्यानं सुरक्षिततेची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी विवाहितेचा पती प्रकाश यासं जायखेडा पोलीस ठाण्यात आणलं.

हेही वाचा-स्वयंपाकाच्या बहाण्यानं घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; VIDEOही केला शूट

याठिकाणी पोलिसांच्या सुरक्षिततेत असताना, प्रकाश यानं पोलिसांची नजर चुकवून एका खोलीत शिरला. याठिकाणी त्यानं टेबलवर खुर्ची ठेवत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना समोर येताच जायखेडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी प्रकाशचा मृतदेह रात्री उशीरा शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. संबंधित आत्महत्या करण्याऱ्या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. सकाळी आईनं आणि सायंकाळी वडिलांनी गळफास घेऊन स्वतःला संपवल्यानं हे दोघे भावंड एकाच दिवशी अनाथ झाले आहेत.

हेही वाचा-15दिवसांपूर्वी कामासाठी आला अन् कायमचा संपला;रुममेटनं चेहरा जाळून गुप्तांग कापलं

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, पत्नीनं आत्महत्या केल्यानंतर विवाहितेचे नातेवाईक मारहाण करतील. या भीतीतून तरुणानं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. एकाच दिवशी दोघां पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दोन्ही परिसरात तणाव निर्माण झाल्यानं परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शनिवारी सकाळी दोघांच्याही मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. आज दोघांवरही अंत्यसंस्कार केले जाणार आहे. याप्रकरणाचा पुडील तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Crime news, Nashik, Suicide, Wife and husband