मराठी बातम्या /बातम्या /nashik /

पतंग पकडण्याच्या शर्यतीत जीवनाची शर्यत हरला; नाशकात चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट

पतंग पकडण्याच्या शर्यतीत जीवनाची शर्यत हरला; नाशकात चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट

Crime in Nashik: सिन्नर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत  (minor boy dead while catching kite) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
नाशिक, 22 डिसेंबर: नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या सिन्नर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत (minor boy dead while catching kite) झाला आहे. पतंग पकडण्यासाठी धावत असताना अंदाज न आल्याने संबंधित मुलाचा विहिरीत पडून हृदयद्रावक शेवट (fell into well and died) झाला आहे. संबंधित घटना सोमवारी सिन्नर परिसरात घडली आहे. प्रज्वल पांडुरंग आव्हाड असं मृत पावलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. मंगळवारी तो आपल्या तीन मित्रांसोबत पतंग उडवत होता. यावेळी पतंग तुटल्याने मृत प्रज्वल आणि त्याचे मित्र पतंग पकडण्यासाठी धावत होते. यावेळी जवळच असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने प्रज्वल थेट विहिरीत जाऊन कोसळला. यावेळी त्याच्या मागे धावणाऱ्या तीन मित्रांनी त्याला हाका मारल्या पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे सर्वजण मोठ्याने रडू लागले. हेही वाचा-डान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग; टीचरचं कृत्य वाचून हादराल यानंतर संबंधित सर्वजण घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत घरी आले आणि त्यांनी संबंधित प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच, आसपासच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. अनेक तरुणांनी विहिरीत उड्या घेऊन प्रज्वलला शोधण्याचा प्रयत्न केला. पण याचा काही उपयोग झाला नाही. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावं लागलं. हेही वाचा-हृदयद्रावक! अखेर मृत्यूशी झुंज संपली, नांदेडात 45 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत अग्निशमन दलाच्या जवानांनी अडीच तास अथक प्रयत्न केल्यानंतर प्रज्वलचा मृतदेह बाहेर काढला. पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याचा अशा प्रकारे हृदयद्रावक शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री उशिरा दोडी याठिकाणी 7 वर्षीय प्रज्वल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Nashik

पुढील बातम्या