VIDEO: गणपती बाप्पाची आरती जितेंद्र आव्हाडांकडून मात्र कायद्याचा प्रसाद कार्यकर्त्यांना

VIDEO: गणपती बाप्पाची आरती जितेंद्र आव्हाडांकडून मात्र कायद्याचा प्रसाद कार्यकर्त्यांना

सरकारमधील मंत्री महोदय आव्हाड यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केली. यामुळे भाविकांसाठी वेगळा अन् मंत्र्यांसाठी वेगळा नियम असतो का? असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला गेला होता.

  • Share this:

नाशिक, 21 जुलै : राज्य मंत्रिमंडळातील गृहनिर्माण खात्याचे कॅबिनेटमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे रविवारी खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आले होते. त्यांनी आनंदवली येथील नवशा गणपती मंदिरात (Navsha Ganpati Mandir) हजेरी लावून आरती केली. त्यानंतरचे मोठे आश्चर्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून मंत्री महोदय आव्हाड यांना वगळता अन्य पाच संशयित कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली जात आहेत. असे असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्री महोदय चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरतीमध्ये सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहे तर दुसरीकडे याच निर्बंधांचं सरसकट उल्लंघन, राज्य सरकार मधील जबाबदार मंत्रीच करताय.

Pegasus Case: "पेगॅससचा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर, केंद्र सरकारच्या संमतीशिवाय असा हल्ला अशक्य"

सरकारमधील मंत्री महोदय आव्हाड यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केली. यामुळे भाविकांसाठी वेगळा अन् मंत्र्यांसाठी वेगळा नियम असतो का? असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला गेला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली खरी. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना वगळून अन्य पाच संशियतांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, तसेच भादंवि कलम 1886, 269 नुसार योगेश नामदेव दराडे , स्वप्नील प्रभाकर चिंचोले , विक्रांत उल्हास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळिवा घुगे या पाच कार्यकत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Sunil Desale
First published: July 21, 2021, 9:02 AM IST

ताज्या बातम्या