Home /News /nashik /

Nashik Corona : 'नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता', छगन भुजबळांचा मोठा इशारा

Nashik Corona : 'नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता', छगन भुजबळांचा मोठा इशारा

नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, असा इशारा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

नाशिक, 22 जानेवारी : "नाशिकमध्ये (Nashik Corona) दर आठवड्याला दुपटीने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या 805 रुग्ण रुग्णालयात 129 ऑक्सिजनवर (oxygen) आणि 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर (ventilator) आहेत. हे प्रकरण हाताच्या बाहेर जाईल, अशी परिस्थिती आहे. कारण 40 टक्क्यांवर पॉझिटिव्हीटी रेट गेलाय", असं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. "टेस्टिंग (Covid testing) वाढवण्याचे सांगितले आहे. पहिला डोस आतापर्यंत सहा ते सात लाख नागरिकांनी घेतला आहे. डोस घेतल्यानंतर फक्त कमी धोका आहे. दोन डोसचे प्रमाण कमी असल्याने त्यांना धोका कायम असेल", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. "लसींचा तुटवडा नाहीय. दुपटीने लसीकरण झालं पाहिजे. नो व्हॅक्सीन, नो एन्ट्रीची कारवाई सुरू केली जाईल. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्या आस्थापना बंद करण्याची कारवाई केली जाईल. स्थानिक प्रशासन त्याबाबत कारवाई करेल. प्रत्येक आस्थापनाची मदत करण्याची तयारी असावी. प्रत्येक दुकानांवर माणूस ठेवता येणार नाही", असं भुजबळ म्हणाले. "सध्या 335 मेट्रिक टन ऑक्सिजन भरुन ठेवला आहे. 47 ठिकाणी सेंटर आहे. ते वापरण्याचे आदेश दिले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. लहान मुलांसाठी बिटको रुग्णालयात व्यवस्था केली आहे. 24 हजार 482 पैकी 2619 विद्यार्थी पॉझिटिव्ह आलेले आहेत. पालकांना आमची विनंती आहे की ताप, खोकला, सर्दी असल्यास मुलांना शाळेत पाठवू नका. मुलगा आजारी दिसल्यास पालकांना शाळेला कळविणे गरजेचे आहे", असं आवाहन भुजबळांनी केलं. ('सुंदरा मनामध्ये भरली' मधील अभ्याच्या लेकीचा क्यूटवाला फोटो पाहिला का?) "शाळा सुरू करण्याची मागणी होतेय म्हणून शाळा सुरू करतोय. हा व्हायरस धोका देत नाही म्हणून लोक बिनधास्त वावरताय. तालुका पातळीवर परिस्थिती बघून तालुक्याच्या शाळा सुरू केल्या जातील. शाळा चालकांनी यंत्रणेनेला सुद्धा वेळोवेळी कळविले पाहिजे. दुसरा डोस वाढविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लसीकरण वाढविले जाईल", अशी माहिती त्यांनी दिली. "नाशिकमध्ये काँग्रेसच्या शिबीरासाठी केवळ पन्नास लोकांना परवानगी असेल. यंत्रणा तपासून निर्णय होईल. तसेच राजकीय नेत्यांनाही नियम लागू असेल", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. यादरम्यान छगन भुजबळ यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या नथुराम भूमिकेशी संबंधित असलेल्या नव्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं. यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. "मी काही बोलणं योग्य होणार नाही. आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी याबाबत भूमिका मांडलीय. त्यामुळे मी याबाबत काही बोलत नाही", असं भुजबळ म्हणाले.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या