कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे पोहोचले

कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा एल्गार, संभाजीराजे पोहोचले

'समाज बोलला,आम्ही बोललो,आता तुम्ही बोला' असं म्हणत मराठा समाजाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे.

  • Share this:

नाशिक, 21 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूरमध्ये  मराठा क्रांती मूक आंदोलन (Kolhapur) यशस्वीपणे पार पडले. त्यानंतर आज नाशिकमध्येही मूक आंदोलन (Maratha Kranti Andolan Nashik) होत आहे. खासदार संभाजीराजे नाशकात दाखल झाले आहे. या मूक आंदोलनाला जिल्ह्यातील 15 आमदारांचा पाठिंबा आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर नंतर नाशकात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडणार आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक सहभागी होणार आहे.

Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत

'समाज बोलला,आम्ही बोललो,आता तुम्ही बोला' असं म्हणत मराठा समाजाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे. या मूक आंदोलनात, सर्वपक्षीय नेते भूमिका मांडणार आहे. या आंदोलनात विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ,मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यासह खासदार डॉ भारती पवार,हेमंत गोडसे भूमिका मांडणार आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या मोफत लसीकरणाची पॉलिसी जाणून घ्या

जिल्ह्यातील सर्व 15 आमदारांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आमदारही आपली भूमिका मांडणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मूक आंदोलन होईल, त्यानंतर संभाजीराजे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कोरोनाचे नियम पाळून या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: June 21, 2021, 9:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या