Home /News /nashik /

Nashik Crime : आधी पत्नीवर गोळीबार, नंतर स्वत:ला संपवलं, पतीने इतकं भयानक कृत्य का केलं?

Nashik Crime : आधी पत्नीवर गोळीबार, नंतर स्वत:ला संपवलं, पतीने इतकं भयानक कृत्य का केलं?

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पिस्तूलने हल्ला केला. आधी त्याने तिच्यावर गोळी झाडली. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून त्याने स्वत:वर गोळी झाडत आपलं आयुष्य संपवलं.

नाशिक, 14 एप्रिल : संशयावर जगात कोणतंही औषध नाही. डोक्यात संशयाचा किडा घुसल्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाली आहेत. असाच धक्कादायक प्रकार येवल्याच्या बाजीराव नगरामध्ये घडला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पिस्तूलने हल्ला केला. आधी त्याने तिच्यावर गोळी झाडली. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून त्याने स्वत:वर गोळी झाडत आपलं आयुष्य संपवलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव भागात पाटावर पाटकर म्हणून कार्यरत असलेला किरण दुकळे हा पत्नीवर नेहमीच संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सारखे खटके उडायचे. त्याचे पत्नीसोबत आज पहाटे भांडण झाले. किरणने खिशातून गावठी पिस्तूल काढून पत्नीच्या डोक्यावर गोळी झाडली. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. ('जे सांगायचे नव्हते तेही सांगुन बसला', मनातलं दुःख लपवू शकला नाही MI चा कॅप्टन रोहित) पतीने झाडलेली गोळी पत्नीच्या डोक्याला चाटून गेली. त्यामुळे सुदैवाने तिचे प्राण वाचले. मात्र संशयाच्या किड्याने किरणचा बळी घेतला. या घटनेमुळे येवल्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतक किरणजवळ गावठी पिस्तूल आणि काडतूस आले कोठून? याचा तपास पोलीस करत आहेत. बीडमध्ये डॉक्टर दाम्पत्यासोबत विचित्र प्रकार दरम्यान, बीडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. बीडमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याला गावगुंडांनी मारहाण केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावगुंडांनी डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याची देखील माहिती समोर आली आहे. संबंधित घटना ही गेवराईजवळ गढी येथे घडली. गढी येथे पीडित डॉक्टर दाम्पत्याचा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या बाहेर आरोपींनी रिक्षा लावली होती. ही रिक्षा थोडीसी बाजूला लावा, अशी विनंती डॉक्टरांनी केली होती. पण त्यावरुन गावगुंडांनी वाद घातला. आरोपींनी पीडित डॉक्टरांशी हुज्जत घातली. त्यानंतर कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण इतकं वाढलं की गावगुंडांनी डॉक्टराला बेदम मारहाण केली. आपल्याला पतीला मारहाण केली जात असल्याचं बघितल्यानंतर त्यांच्या पत्नी अस्वस्थ झाल्या. त्यादेखील पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नराधमांनी महिलेवरही हात उचलला. महिलेची ओढणी ओढत आरोपींनी विनयभंग केला. या संबंध घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेवर हळहळ व्यक्त केली जात असून गावगुंडांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी दबक्या आवाजात केली जात आहे.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या