नाशिक, 23 डिसेंबर : मालेगावात (Malegaon corporator) 89 पैकी फक्त 28 नगरसेवकांनी घेतले लसीचे दोन डोस (Corona Vaccination) घेतल्याचं समोर आलं आहे. याचा अर्थ 89 पैकी 61 नगरसेवकांनी कोरोनाच्या दोन्ही लशी घेतल्या नाही. महापालिकेच्या सभेत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या मालेगावात लस घेण्याबाबत नागरिकांमध्येच नव्हे, तर नगरसेवकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उदासीनता असून 89 पैकी फक्त 28 नगरसेवकांनी दोन डोस घेतल्याचे धक्कादायक वास्तव महापालिकेच्या महासभेत समोर आले आहे.
त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून याबाबत महापौर ताहेरा शेख यांनी नाराजी व्यक्त करून ज्यांच्यावर लसीकरणा बाबत जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी आहे तेच लोक प्रतिनिधी जर असे वागत असतील तर मग शहरातून कोरोना कसा हद्दपार होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून सर्व नगरसेविकानी तातडीने लस घेण्याचे त्यांनी आवाहन केले. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. ज्यांनी दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच ऑफ लाईन सभेत सहभागी होता येईल अशी अट घालण्यात आली होती.
त्यामुळे दोन डोस घेतलेले फक्त 28 नगरसेवक होते. त्यांनी ऑफ लाईन सभेत सहभाग घेतला. उर्वरित नगरसेवकांनी ऑन लाईन सभेत हजेरी लावली. खरं तर सर्वच नगरसेवकांनी लशीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असतांना देखील 89 पैकी फक्त 28 नगरसेवकांनी दोन डोस घेतले आहे. अगोदरच वेगवेगळ्या अफवा आणि गैरसमजमुळे मालेगावात लसीकरण फार कमी झालेले आहे.
हे ही वाचा-नाशकात मध्यरात्री हाणामारीचा थरार; मिठी मारल्याने वादाला फुटलं तोंड
नागरिकांमध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे असताना तेच जर लस घेणार नसतील तर नागरिकांमध्ये जनजागृती कशी निर्माण केली जाणार. सोमवारपासून शहरात नो व्हॅक्सिन नो एंट्री नियमाची अंमलबजावणी केली जाणार असून शासकीय कार्यालये, मॉल्स आदी ठिकाणी ही सक्ती राहणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले.
कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता ओमायक्रोनचा धोका वाढलेला आहे. अशा वेळी ज्यांच्यावर लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी आहे, तेच नगरसेवक बेजबाबदारपणे वागत असतील तर कोरोना कसा हद्दपार होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.