मराठी बातम्या /बातम्या /nashik /Maharashtra Unlock : नाशिककरांना सुखद धक्का; जाणून घ्या काय होणार सुरू

Maharashtra Unlock : नाशिककरांना सुखद धक्का; जाणून घ्या काय होणार सुरू

नाशिककरांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

नाशिककरांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

नाशिककरांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

नाशिक, 3 जून : आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत मिशन बिगेन अगेनची घोषणा केली. यावेळी त्यांनी राज्यातील (Maharashtra Unlock) ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्के आणि त्याहून कमी पॉझिटिव्ही रेट आहे, तिथे अनलॉक जाहीर केला आहे. वडेट्टीवारांनी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून त्या यादीत नाशिकचाही (Nashik Unlock) समावेश आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

गेल्या महिन्यात नाशिकमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. आता मात्र पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. साप्ताहिक सरासरीनुसार नाशिकमध्ये रुग्णवाढीचा दर 0.26 इतका आहे. दरम्यान बुधवारी नाशिकमध्ये निर्बंध शिथिल होताच मोठी गर्दी जमा झाली होती. शहरात निर्बंध शिथिल होताच कोरोना संसर्गाची भीती बाजूला सारत नाशिककरांनी नियम पायदळी तुडवत सलग दुसऱ्या दिवशी बाजारात गर्दी केल्याचं वृत्त होतं.

अनलॉक झालेल्या जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे

हे ही वाचा-Unlock Breaking : ठाणे संपूर्ण अनलॉक; मात्र लोकलमधून करू शकणार का प्रवास?

 1. ठाणे
 2. औरंगाबाद
 3. लातूर
 4. नांदेड
 5. जालना
 6. परभणी
 7. बुलढाणा
 8. नाशिक
 9. जळगाव
 10. धुळे
 11. नागपूर
 12. भंडारा
 13. गडचिरोली
 14. चंद्रपूर
 15. गोंदिया
 16. वर्धा
 17. वाशिम
 18. यवतमाळ

पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पूर्णत: अनलॉक

पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेनं व्यवहार सुरु राहतील असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्या थिएटर्स, कार्यालयं, शूटिंग, जिम, सलून सुरु राहतील. त्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमास 50 टक्के परवानगी असेल. लग्न सोहळ्यास हॉलना 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 लोकांना उपस्थिती राहण्याची मुभा असेल. अंत्यविधी सोहळ्यास सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल.

First published:

Tags: Corona, Corona updates, Nashik