Home /News /nashik /

'वडिलांचा पगार कमी असल्याने उच्च शिक्षण घेण्यात अडचणी', मालेगावात ST कर्मचाऱ्याच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

'वडिलांचा पगार कमी असल्याने उच्च शिक्षण घेण्यात अडचणी', मालेगावात ST कर्मचाऱ्याच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

'वडिलांचा कमी पगार असल्याने उच्च शिक्षण घेण्यात अडचणी', मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

'वडिलांचा कमी पगार असल्याने उच्च शिक्षण घेण्यात अडचणी', मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

ST employee son attempts suicide in Malegaon Nashik: वडिलांना कमी पगार असल्यामुळे उच्च शिक्षण घेता नसल्याचा नैराश्येतून एसटी चालकाच्या मुलाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

मालेगाव, 30 ऑक्टोबर : राज्यात एसटी (ST) कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर येत असतानाच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथील एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मालेगावातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (ST employee attempt suicide) वडिलांना कमी पगार असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक अडचण येत असल्याच्या नैराश्येतून एसटी चालकाच्या तरुण मुलाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मालेगावात घडली. या तरुणाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र, त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. कमी पगार तर आहेच शिवाय तो देखील वेळेवर मिळत नसल्याने प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. जगावे तरी कसे असा प्रश्न एसटी कामगारांना भेडसावत आहे. एसटी कामगार किती हालाकीचे जीवन जगतात हे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शासनाने या कामगारांच्या मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. नगरमध्ये एसटी डेपोत चालकाची आत्महत्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. 29 ऑक्टोबर 2021 रोजी अहमदनगरमध्ये एसटी चालकाने आत्महत्या केली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे. दिलीप काकडे हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान दिलीप काकडे यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्यावर कर्ज होते का? किंवा आर्थिक विवंचनेतून त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं का? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीये. धुळ्यातील ST कर्मचाऱ्याची आत्महत्या ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनही केलं होतं. महागाई भत्ता वाढीची घोषणा दोन दिवसांपूर्वीच एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अँड अनिल परब यांनी घोषणा केली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांनाही 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. याआधी या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. याशिवाय याशिवाय घरभाडे भत्ता 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के असा करण्याची मागणी अनिल परब यांनी मान्य केली. या आधी हा भत्ता 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के असा मिळत होता.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Nashik, Nashik suicide

पुढील बातम्या