कोरोनाकाळात सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणांत वाढ; नाशकात 69 मुली घरातून पळाल्या

कोरोनाकाळात सोशल मीडियावरील प्रेमप्रकरणांत वाढ; नाशकात 69 मुली घरातून पळाल्या

कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणासाठी अनेकांच्या हातात मोबाईल आला आहे. परिणामी व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियांचा (Social media use) वापर देखील वाढला आहे.

  • Share this:

नाशिक, 27 जून: मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (corona pandemic) सुरू आहे. परिणामी देशातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) अवलंब केला. ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब केल्यानं अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरात अडकून पडल्या आहेत. त्यांना त्यांच्या मित्र मैत्रिणींना भेटता येत नाही. संवाद घडत नसल्यानं अनेकांना नैराश्याचा सामना देखील करावा लागत आहे.

कोरोनाकाळात शाळा बंद असल्यानं अनेक विद्यार्थांच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. या स्मार्टफोनचा काही जणांनी चांगला वापर केला, तर काहींनी वाईट. सतत मोबाईलचा वापर सुरू असल्यानं व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियांचा (Social media use) वापर देखील वाढला आहे. याठिकाणी अनेकांची नवीन व्यक्तींसोबत ओळख झाली आहे. त्यांच्यात मैत्री (Friendship) वाढत जात अनेकांची प्रेमप्रकरणं  (Love affair) देखील सुरू झाली आहे. तर काहींनी सोशल मीडियावर मिळालेल्या प्रेमासाठी आपलं घरं सोडायलाही (Many girls leave home for lover) मागं पुढं पाहिलं नाही.

एकट्या नाशिक शहरात कोरोना काळात तब्बल 69 मुलींनी आपलं घर सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 18 वर्षांखालील मुलींचा जास्तीत जास्त समावेश आहे. कोरोना विषाणूच्या दीड वर्षांच्या काळात नाशिक शहरातील 69 मुलींनी आपला प्रियकर किंवा इतर वेगवेगळ्या भूलथापांना बळी पडत आपल्या घरातून पळ काढला. यातील 54 मुलींची समजूत घालून पुन्हा त्याच्या घरी पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये मागील वर्षी 37 तर यावर्षी 17 मुलींना पोलिसांनी घरी पाठवलं आहे.

हेही वाचा-बर्थडे असल्याचं सांगत केला विश्वासघात;पार्टीला बोलावून तरुणीवर कारमध्ये बलात्कार

कोरोना काळात अनेकांना बराच मोकळा वेळ मिळाला आहे. त्यामुळे या वेळेचा जास्तीत जास्त वापर मोबाईल मोबाइल वापरासाठीचं केला जात आहे. त्यामुळे घरातील लेकरांसोबतचा संवाद तुटत आहे. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू आहे. याचा थांगपत्ताही पालकांना कळत नाहीये. त्यामुळे घरातील पौगंडावस्थेतील मुलं मुली सोशल मीडियाकडे जास्तीत जास्त आकर्षित होतं आहेत. यातूनचं अशाप्रकारची प्रकरणं घडत आहेत.

Published by: News18 Desk
First published: June 27, 2021, 2:58 PM IST

ताज्या बातम्या