Home /News /nashik /

जळगाव : महिलेचं भयंकर कृत्य; माचिसची जळती काडी बोगीत फेकून लावली आग

जळगाव : महिलेचं भयंकर कृत्य; माचिसची जळती काडी बोगीत फेकून लावली आग

भुसावळ रेल्वे (Bhusawal Railway Station) स्थानकावर एका महिलेकडून बोगीत आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जळगाव, 14 मार्च : भुसावळ रेल्वे (Bhusawal Railway Station) स्थानकावर एका महिलेकडून बोगीत आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माचिसची जळती काडी बोगीत फेकून आग (Fire) लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. बोगीत कांद्याचे पोते असल्याने बोगीत आग लागली. बोगीला आग लागल्याचे लक्षात येतात रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सांगोला येथून मुजफ्फरपुरकडे जाणारी किसान रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 7 वर उभी असताना हा प्रकार घडला. भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या सांगोला मुजफ्फरपुर किसान रेलच्या बोगीत एका महिलेने माचिसची जळती काडी खिडकीतून फेकत बोगीला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान बोगीमध्ये कांद्याचे पोते असल्याने बोगीत आग लागली. हे ही वाचा-घराकडे निघालेल्या बाप-लेकाने मृत्यूने गाठलं, अपघाताचा अंगावर काटा आणणारा VIDEO हा प्रकार लक्षात येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत तत्काळ बोगीला लागलेली आग विझवली. दरम्यान घटनास्थळी भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक तथा रेल्वेचे अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. सदर महिला ही कायम रेल्वे परिसरात भटकत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत रेल्वे सुरक्षा बलाकडून तपास सुरू आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Bhusawal s13a012, Fire

पुढील बातम्या