मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिकमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन? रुग्णांमध्ये दिसून आली वेगळीच लक्षणे

नाशिकमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन? रुग्णांमध्ये दिसून आली वेगळीच लक्षणे

नाशिकमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये नवी लक्षणे दिसत असल्याचं आढळून आलं आहे.

नाशिकमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये नवी लक्षणे दिसत असल्याचं आढळून आलं आहे.

नाशिकमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये नवी लक्षणे दिसत असल्याचं आढळून आलं आहे.

लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 प्रतिनिधी

नाशिक, 1 मे: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ लागला आहे आणि सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स उपलब्ध होत नसतानाच आता नाशिकमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन (Coronavirus new strain) नाशिक (Nashik)मध्ये आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन?

नाशिकमधील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वेगळीच लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकमधील कोरोना बाधित आणि डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये ही नवी लक्षणे आढळून येत असल्याचं दिसत आहे.

नवी लक्षणे आढळून येत असलेल्या रुग्णांच्या नाकात, डोळ्याला इजा होत आहे. इतकेच नाही तर यामुळे अनेक रुग्ण दगावतही आहेत. तसेच रुग्णांचे डोळे निकामी होण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. हा नवा स्ट्रेन भारतातीलच असल्याचा दावाही तज्ज्ञ डॉक्टर्स करत आहेत. कोरोना बाधित रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या या नव्या लक्षणांमुळे आता डोकेदुखी आणखी वाढली आहे.

देशातील जनतेला मरायला सोडलं आहे का? नाना पटोलेंचा मोदी सरकारला संतप्त सवाल

नाशिकमधील कोरोनाची स्थिती?

30 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1820 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले होते. 2766 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर त्याचवेळी 24 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या नाशिकमध्ये एकूण 22,474 सक्रिय रुग्ण आहेत. नाशिकमध्ये आतापर्यंत 168724 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिकमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के इतके आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Nashik