लासलगावात भीषण अपघात, हायवा ट्रक आणि रिक्षाची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

लासलगावात भीषण अपघात, हायवा ट्रक आणि रिक्षाची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

दोन प्रवाशी अंत्यविधी कार्यक्रम आटपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

  • Share this:

लासलगाव, 26 सप्टेंबर : नाशिक (nashik) जिल्ह्यातील लासलगावात (laslgaon) भीषण अपघात झाला आहे. भरधाव हायवा ट्रकने (hiwa track) रिक्षाला (auto rickshaw) जोराची धडक दिली आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेस समोर ॲपे रिक्षा आणि हायवा याच्यामध्ये  जोरदार धडक झाली आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

लासलगावहुन विंचूरच्या दिशेने निघालेली ॲपे रिक्षा क्रमांक MH.15.Y.4461 मध्ये रिक्षा चालकासह पाच जण प्रवास करत होते.  विंचूरहून लासलगावच्या दिशेने निघालेल्या हायवाने जोरदार धडक दिल्याने जागेवरती पाच जणांचा मृत्यू झाला.  हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

सरांनंतर आता मॅडमचा Dance Video Viral; वर्गातच शिक्षकांनी घातला धुमाकूळ

रिक्षामधील पाच जण जागीच ठार झाले आहे. या घटनेत लासलगावी अंत्यविधीसाठी लोणी तालुक्यातील राहता येथील दोन जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये 5 ही पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये सुहास मनोहर निकाळे (वय 40 विंचूर रिक्षा चालक), विठ्ठल बाजीराव भापकर (वय 65 लोनी प्रवरा), भाऊसाहेब बाळासाहेब नागरे (वय 60 लोणी प्रवरा), किसनदास बैरागी (वय 60 धारणगाव खडक) आणि रतन पवार (वय 40 इंदीरानगर विंचूर) यांचा समावेश आहे.

विकृतीचा कळस! महिला कॉन्स्टेबलवर तिघांचा बलात्कार, आरोपीची आईदेखील गजाआड

यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांच्याकडे अंत्यविधीसाठी सकाळी आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आटपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Published by: sachin Salve
First published: September 25, 2021, 9:30 PM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या