अखेर त्यांचं प्रेम जिंकलं! हिंदू मुलीनं मुस्लीम मुलाशी बांधली लग्नगाठ; लव्ह जिहादच्या आरोपामुळे टळलं होतं लग्न

अखेर त्यांचं प्रेम जिंकलं! हिंदू मुलीनं मुस्लीम मुलाशी बांधली लग्नगाठ; लव्ह जिहादच्या आरोपामुळे टळलं होतं लग्न

Nashik Love Jihad case: काही दिवसांपूर्वी नाशकातील एक विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला होता. एका मुस्लीम मुलानं हिंदू मुलीशी कोर्टात जाऊन विवाह (Court marriage) केला होता. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं झालेल्या या लग्नाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आला होता.

  • Share this:

नाशिक, 23 जुलै: काही दिवसांपूर्वी नाशकातील (Nashik) एक विवाह (Marriage) सोहळा चांगलाच चर्चेत आला होता. एका मुस्लीम मुलानं हिंदू मुलीशी कोर्टात जाऊन विवाह (Court Marriage) केला होता. दरम्यान कोर्टाच्या बाहेर फलकावर लावण्यात आलेली लग्नपत्रिका एका अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियावर अपलोड केली. ही लग्न पत्रिका व्हायरल होताच, अनेकांनी या लग्नाला विरोध केला. शिवाय जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांच्या मर्जीनं आयोजित केलेल्या लग्नात लव्ह जिहादचा (Love Jihad) रंग देण्यात आला होता.

तसेच अनेकांनी लग्न मोडण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला होता. याचे सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटले होते. तर संबंधित कुटुंबाना हे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली होती. आता कुठे हे प्रकरण शांत झाल्यावर दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोन्ही कुटुंबीयांनी आपापल्या पाल्याचा विचार करून हा विवाह सोहळा आयोजित केला होता. पण बाहेरच्या लोकांना या लग्नाची अडचण झाली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांना धमक्या मिळत होत्या.

हेही वाचा-गोड बोलून साडी नेसायला देत महिलेसोबत संतापजनक कृत्य; पुण्यातील धक्कादायक प्रकार

अखेर गुरुवारी एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आहे. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पद्धतीनं हा विवाह लावण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी संबंधित जोडप्यानं कुटुंबांच्या सहमतीनं न्यायालयात जाऊन विवाह केला होता. दरम्यान गेल्या आठवड्यात राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत, या विवाहाला कुणीही अडथळा न करण्याचे आवाहन केलं होतं. यासोबतच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल आणि छात्रभारती संघटनेचे कार्यकर्ते दोन्ही कुटुंबीयांच्या पाठिंब्यासाठी विवाहस्थळी उपस्थित होते.

हेही वाचा-6 महिन्यांपासून मुलीवर बलात्कार करत होता बाप; 10 वर्षीय भावानं केली सुटका

कोणत्याही प्रकारच्या वादाला तोंड फुटू नये, म्हणून हा विवाह मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे. तसेच संबंधित विवाहाचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी मिळून घेतलेला आहे. त्यामुळे सर्व समाजानं प्रेमाच्या भावनेतून या लग्नाचा स्विकार करावा, असं आवाहनही मुलीच्या वडिलांनी केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: July 23, 2021, 12:37 PM IST

ताज्या बातम्या