मराठी बातम्या /बातम्या /nashik /

पावसाचं थैमान सुरुच... पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

पावसाचं थैमान सुरुच... पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

Biker swept away in flood, luckily saved people watch live video: मुसळधार पावसात आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ग्रामस्थांनी वाचवले.

मनमाड, 9 ऑक्टोबर : देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नांदगावच्या वडाळी (Vadali Nandgaon) भागातील नागरिकांना आला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) नदी-नाले, ओढ्यांना पूर आला असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वडाली-नांदगाव मार्गावर (Vadali Nandgaon road) असलेला फरशीपुला वरून पुराचे पाणी वाहत असतांना एका तरुणाने मोटरसायकल पाण्यातून जाण्याचे धाडस केले. मात्र त्याचे हे धाडस त्याच्या अंगलट येऊन तो मोटारसायकलसोबत पुराच्या पाण्यात वाहू लागला. (Bike rider swept away in flood water) पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या या तरुणाचे नशीब बलवत्तर होते त्यामुळे तो बचावला. पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहून तेथे उभे असलेल्या तरुणांनी तात्काळ त्याच्या मदतीला धाव घेतली. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या या तरुणाला वाचवून तरुणांनी जीवदान दिले आहे. हा सर्व थरार एका व्यक्तीने मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. पावसाचा कहर, त्यात आली पोहण्याची लहर अन्... गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. पावसाचं थैमान असतानाच एका तरुणाने थेट पोहण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि हा प्रकार त्याच्या अंगलट आल्याचं पहायला मिळालं. नाशिकमधील रामकुंड परिसरात हा तरुण पोहण्यासाठी उतरला. मात्र, पावसाचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून जाण्यास सुरुवात झाली. सुदैवाने त्या परिसरात असलेल्या जीवरक्षकांनी त्याला पाहिले आणि मदतीसाठी उडी घेतली. या तरुणाला 500 मीटर अंतरावर लाईफ गार्ड्सने बचावले आणि सुखरूप बाहेर काढले. ही घटना 28 सप्टेंबर रोजी घडली असून त्याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला होता. यवतमाळमध्ये मुसळधार पावसात 60 जनावरे गेली वाहून, LIVE VIDEO पाच दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसात 60 जनावरे वाहून गेली. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात (Mahagaon Talukha Yavatmal) 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे (Heavy rainfall) नाल्याला आलेल्या पुरात बेलदारी (Beldari) येथील 60 ते 70 जनावरे वाहून गेली. या घटनेने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. जनावरे वाहून जात असतानाची ही घटना एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. 4 ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले. बेलदारी येथील गाव तलाव ओव्हर फ्लो झाल्याने या तलावातून वेगाने पाणी वाहत होते. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेलदारी येथील गुराखी आपल्या गाई-गुरे गावाकडे घेऊन जात असताना गावा शेजारच्या नाल्याला पूर आला. गाई, गुरे, वासरे हा नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात ते वाहून गेले.
First published:

Tags: Nashik, Rain

पुढील बातम्या