मालेगाव, 29 जून: मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसण्यावरून झालेल्या वादातून (Hassle for sitting on principals chair) शाळेच्या अध्यक्षानं एका शिक्षकाला बेदम मारहाण (President beat teacher) केली आहे. या मारहाणीत संबंधित शिक्षकाचे दात पडले (Break teachers teeth) आहेत. या हाणामारीत जखमी झालेल्या शिक्षकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिक्षक आणि अध्यक्षानं एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बिलाल अहमद अब्दुल अन्सारी असं मारहाण झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. संबंधित घटना शनिवारी (26 जून) सकाळी हजार खोली भागातील शेख उस्मान हायस्कूलमध्ये घडली आहे. मोमीनपुरा येथील रहिवासी असणारे बिलाल अन्सारी हे शेख उस्मान हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेचे अध्यक्ष अखलाख अहमद मोहंमद अय्यूब यांनी बिलाल यांना मारहाण केली आहे.
मारहाणीत शिक्षकाचे पाडले दात
शाळेचे अध्यक्ष अखलाख अहमद मोहंमद अय्यूब यांनी अन्सारी यांनी मुख्यध्यापकाच्या खुर्चीवर बसायचं नाही, असं सांगून वाद घातला. यातूनच झालेल्या हमरीतुमरीतून अय्यूब यांनी अन्सारी यांना दमदाटी करत बेदम मारहाण केली. ज्यामध्ये पीडित शिक्षक अन्सारी यांचे दात पडले आहे. मारहाण झाल्यानंतर अन्सारी यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून दोघांनी परस्परविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-सावधान! लहान मुलांवर हात उचलणं आई-वडिलांना पडणार महागात! थेट तुरुंगवासाची शिक्षा
विनयभंगाचा आरोप
याशिवाय शाबिना अखलाख अहमद आणि इकरानाज अखलाख अहमद यांनीही संबंधित शिक्षकाला मारहाण केली आहे. शिवाय त्यांनी छेडछाडीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली. मारहाणीत जखमी झालेल्या अन्सारी यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून शाबिना यांनी जखमी शिक्षक अन्सारी यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोपी केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि उपनिरीक्षक के जी व्यवहारे करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beating retreat, Crime news, Malegaon, Nashik