LIVE VIDEO: नवरात्री उत्सवाला गालबोट; नाशकात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा पोलिसांसोबत राडा

LIVE VIDEO: नवरात्री उत्सवाला गालबोट; नाशकात देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा पोलिसांसोबत राडा

नाशिक येथील वणी सप्तश्रृंगी देवी गडाच्या पायथ्याशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद (hassle between police and Devotees) झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 11 ऑक्टोबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असूनही देशात अनेक ठिकाणी नवरात्री उत्सव आनंदात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी भाविक कोरोना नियमांचं पालन करत देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. पण काही ठिकाणी हिंसक घटना घडून नवरात्री उत्सवाला गालबोट लागत आहे. नाशिक येथील वणी सप्तश्रृंगी देवी गडाच्या पायथ्याशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद (hassle between police and Devotees) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा  व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे.

खरंतर, नांदूर नाका येथून गडावर वाहन सोडण्यास मनाई आहे. असं असलं तरी नांदूर नाक्यावरून देवीच्या गडावर जाण्यासाठी भाविकांसाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. असं असूनही काही भाविकांनी त्याचं वाहन गडावर सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. रात्रीच्या सुमारास आलेल्या 20 ते 25 जणांनी पोलिसांसोबत वाद घातला आहे. ही सर्व घटना घटनास्थळी जमलेल्या काहीजणांनी आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आहे.

20 ते 25 जणांनी पोलिसांची हुज्जत घातल्याने वणी सप्तश्रृंगी देवी गडाच्या पायथ्याशी बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तरुणांची वाढती दादागिरी पाहून संबंधित पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाचारण केलं. अतिरिक्त पोलीस येताच भांडखोर तरुणांनी घटनास्थलावरून पळ काढला आहे. ही घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा-चिमुकल्या लेकींसमोर आईनं तळतळत सोडला प्राण; देवीच्या दर्शनासाठी जाताना आलं विघ्न

दुसऱ्या एका घटनेत, नांदगावमध्ये नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी पाहटे आपल्या तीन चिमुकल्या लेकींना घेऊन मैत्रिणींसोबत दर्शनासाठी जात असताना, हा अपघात घडला आहे. लोहमार्ग ओलांडताना दोन रेल्वे एकाच वेळी पास झाल्याने, दुसऱ्या रेल्वेच्या धडकेत संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: October 11, 2021, 10:36 AM IST

ताज्या बातम्या