Home /News /nashik /

खासगी रुग्णालयाची मनमानी चव्हाट्यावर; अर्धनन्ग आंदोलन करताच रुग्णालयाने परत केले दीड लाख

खासगी रुग्णालयाची मनमानी चव्हाट्यावर; अर्धनन्ग आंदोलन करताच रुग्णालयाने परत केले दीड लाख

नाशिकमध्ये खासगी रुग्णालयाकडून सर्वसामान्य नागरिकांची रुग्णालयाकडून लूट होत असल्याच प्रकार फेसबूक लाईव्हवर अर्धनग्न आंदोलन करत चव्हाट्यावर आणण्यात आला आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 25 मे: कोरोनाच्या या संकट काळात (Corona Pandemic) रुग्ण आणि रुग्णांची लूट सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. या रुग्णालांना कधी चाप बसणार आणि सर्वसामान्यांची लूट कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयाने डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे परत करण्याचे नावच घेत नसल्याने त्यांच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन (half naked protest against hospital) करण्यात आलं. अर्धनग्न आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यांनी तात्काळ रुग्णाच्या नातेवाईकाला पैसे परत दिले. नाशिकमधील एका खाजगी हॉस्पिटलने कोरोना बाधित रुग्णांना अवाजवी बिल आकारत त्याने भरलेले डिपॉझिटचे 1 लाख 40 हजार रुपये परत करण्यास नकार दिला होता. या रुग्णांचे 10 लाख रुपये मेडिक्लेम कंपनीने हॉस्पिटलला दिले होते. मात्र या दरम्यान हॉस्पिटल सेफ साईड म्हणून 1 लाख 40 हजार रुपये डिपॉजीट म्हणून घेतले होते. तसेच ते पैसे परत सुद्धा देण्यात येत नव्हते. 5 महिन्यांत 7 वेळा इन्फेक्शन, सातवी सर्जरी; ब्लॅक फंगसमुळे भयंकर अवस्था, पण त्याने मानली नाही हार या घटनेच्या विरोधात पीडित रुग्णांच्या मुलाने रूग्णांना आवाजवी बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल विरोधात मोहीम सुरू केलेल्या ऑपरेशन हॉस्पिटल या सामाजिक चळवळीच्या टीमकडे मदत मागतली. यानंतर त्यांनी टीमसह हॉस्पिटलमध्ये धडक दिली आणि या टीमला देखील हॉस्पिटलने उडवा उडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार दिला. या नंतर या टीमने थेट हॉस्पिटलच्या कार्यलयातच कपडे काढूत नग्न अवस्थेत आंदोलन करत पैसे मिळवून देण्याची मागणी केली. तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनाला नंतर अखेर हॉस्पिटलने रुग्णाकडून घेतलेले डिपॉझिटचे 1 लाख 40 हजार रुपये परत केले. कोरोनाच्या या संकटात अशा प्रकारे रुग्णालयांकडून सर्वसामान्य नागरिकांची लूट होण्याचे आतापर्यंत अनेक प्रकार समोर आले आहेत. या रुग्णालयांना चाप कधी बसणार आणि अशा प्रकारे नागरिकांची लूट कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra, Nashik

    पुढील बातम्या