मराठी बातम्या /बातम्या /nashik /Nashik : नाशिककरांची दिवाळी होणार दणक्यात, फटाकेबंदीचा प्रस्ताव महासभेत एकमताने फेटाळला

Nashik : नाशिककरांची दिवाळी होणार दणक्यात, फटाकेबंदीचा प्रस्ताव महासभेत एकमताने फेटाळला

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Fire Crackers ban proposal rejected: यंदाची दिवाळी नाशिककरांची दणक्यात साजरी होणार असल्याचं दिसत आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 20 ऑक्टोबर : दिवाळीत (diwali) नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) फटाके विक्रीवर बंदी (Firecrackers banned) घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी पत्रक काढले होते. हे पत्रक उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांना देण्यात आले होते. फटाके बंदीच्या या निर्णयामुळे फटाके विक्री करणारे तसेच नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती. पण या संदर्भात आज नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) महासभेत मांडलेला प्रस्ताव सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने फेटाळला आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांची दिवाळी दणक्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक शहरातील फटाके बंदीचा विषय एकमताने फेटाळला आहे. नाशिक महानगरपालिका माहसभेत सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळांच्या मध्यस्थी नंतरही फटाके बंदीची टांगती तलवार कायम होती. मात्र आता महासभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. फटाके बंदीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनीच घ्यावा असा विभागीय आयुक्तांनी आदेश दिला होता.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आधिच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीही फटाक्यांवर बंदी असल्याने वापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी फटाके बंदीच्या संदर्भात पत्रक काढल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता उद्भवली होती. फटाके विक्री करुन उदर्निवाह करणाऱ्यांसमोरही मोठे संकट उभं रिहलं होतं. पण आता फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने या व्यापाऱ्यांन मोठा दिलासा मिळाली आहे.

वाचा : शिक्षणासाठी पैसे मागितल्याने संतापला नवरा, रागाच्या भरात बायकोला ढकलले विहिरीत

महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधऱा योजने अंतर्गत दिवाळीत होणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी फटाके विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला होता. तसेच त्या संदर्भात सर्व मनपांना पत्र सुद्धा लिहिलं होतं.

काय म्हटलं होतं विभागीय आयुक्तांनी पत्रात

नाशिक विभागात फटाक्यांवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्देश दिले होते. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगांव जिल्ह्यात हा निर्णय लागू होणार होता. या सर्व 5 जिल्ह्यात फटाके स्टॉल्सचे लिलाव पालिकांनी काढले होते त्यानंतर विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हे लिलाव अडचणीत आले होते. वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

राम कदमांनी केली होती टीका

प्रत्येक वेळेस कोणते तरी कारण काढत हिंदू सण आले की महाविकास आघाडी सरकार बंधन घालत आहे. प्रदुषण जास्त होणार फटाके बंदी ठीक आहे पण सरसकट बंदी योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राम कदम यांनी दिली होती.

First published:
top videos

    Tags: Diwali 2021, Nashik