Home /News /nashik /

बंद खाणीच्या तळ्यात आढळला 3 वर्षांच्या मुलांसह वडिलाचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ

बंद खाणीच्या तळ्यात आढळला 3 वर्षांच्या मुलांसह वडिलाचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ

बंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

    नाशिक, 07 सप्टेंबर : नाशिक (Nashik ) जिल्ह्यातील सिद्ध पिंपरी गावात असलेल्या दगडाच्या बंद खाणीच्या (mine) तळ्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह (dead body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यात तीन आणि चार वर्षांचा मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावातील ही धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी खाणीतील तळ्यात एका पुरुषासह दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहे. शंकर महाजन (वय ३४), पृथ्वी महाजन (वय ४), प्रगती महाजन (वय ३) अशी मृतांची नाव आहे. राज कुंद्रा नसताना शिल्पाने एकटीनेच घरी आणला बाप्पा, असं झालं आगमन पोळ्याच्या दिवशी शंकर महाजन हे आपल्या आपल्या मुलांगस घरातून निघून गेले होते. त्यांचा सर्वत्र शोधशोध घेतला असता पण कुठेही पत्ता लागला नाही. पण, सकाळी खाणीमध्ये तीन जणांचे मृतदेह आढळून आले. मृतदेहाची जेव्हा ओळख पटवण्यात आली  तेव्हा शंकर महाजन आणि त्यांचा मुलाचे मृतदेह असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. IND vs ENG : टीम इंडिया पुन्हा जाणार इंग्लंड दौऱ्यावर, Schedule ची घोषणा शंकर महाजन यांनी आपल्या मुलांसह या बंद पडलेल्या खाणीतील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. शंकर महाजन हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. चिमुकल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्यामुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nashik, नाशिक

    पुढील बातम्या