Home /News /nashik /

लासलगावमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बनावट नोटा जप्त

लासलगावमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बनावट नोटा जप्त

लासलगावमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बनावट नोटा छापण्याचं साहित्य जप्त

लासलगावमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बनावट नोटा छापण्याचं साहित्य जप्त

Fake Currency Racket busted: बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

लासलगाव, 13 ऑक्टोबर : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake currency) चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) पर्दाफाश केला आहे. एका महिलेसह पाच जणांना सापळा रचून पोलिसांनी अटक (police busted fake currency racket) केली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. आरोपींनी नकली नोटा कुठून आणल्या आणि त्या किती चलनात आणल्या याचा कसून तपास केला जात आहे. लासलगाव परिसरात नकली नोटा चलनात आणल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोहन बाबुराव पाटील, प्रतिभा बाबुराव घायाळ, विठ्ठल चपांलाल नाबरीया, रविंद्र राऊत, विनोद पटेल यांना अटक करण्यात आली आहे. विनोद मोहनभाई पटेल हा त्यांचेडील इटीऑस कारमध्ये आले असता छापा टाकुन त्यांचेकडुन 500 रुपयांच्या बनावट 291 नोटा आणि इटीऑस कार किमंत अंदाजे 4,00,000 रुपये जप्त करण्यात आली आहे. लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांच्या विरुध्द भादवि कलम 48 9 क, ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गोंदियात तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त जून महिन्यात गोंदियात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये पोलिसांनी तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यामध्ये 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत सर्व किंमतीच्या बनावट नोटा असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया भागात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींपैकी 6 बालाघाटचे तर 2 गोंदियाचे रहिवासी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. मध्यप्रदेशमधील बालाघाट पोलिसांना बनावट नोटांचं व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची टीप सूत्रांकडून मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर बालाघाट आणि गोंदिया या भागात हे रॅकेट कार्यरत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी गुप्त मोहिम राबवत एका आरोपीला 8 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं बालाघाट आणि गोंदियातील ठिकाणांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून बालाघाट पोलिसांनी 8 जणांना अटक केली. मार्च महिन्यातही पकडलं होतं रॅकेट पोलिसांनी या वर्षीच्या मार्च महिन्यातही बनावट नोटा खपवण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 94 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. आताच्या 5 कोटींच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा त्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या