Home /News /nashik /

नाशकातील बिटको रुग्णालयात नगरसेविकेच्या पतीचा राडा; पाहा EXCLUSIVE VIDEO

नाशकातील बिटको रुग्णालयात नगरसेविकेच्या पतीचा राडा; पाहा EXCLUSIVE VIDEO

Nashik Hospital CCTV: महानगरपालिकेच्या रुग्णालयात कार घुसवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 15 मे: नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बिटको रुग्णालयात (Bitco Hospital) सायंकाळच्या सुमारास अचानक एक इनोव्हा कार घुसली. ही इनोव्हा कार एका भाजप नगरसेविकेच्या पतीची असल्याचं उघडकीस आलं आहे. नगरसेविकेच्या पतीने (Corporator Husband) थेट रुग्णालयातच कार घुसवली. थेट रुग्णालयात कार घुसवल्याने रुग्णालयाच्या मुख्यद्वाराचे काचेचं गेट पूर्णत: उद्धवस्त झालं. ही संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याचे वृत्त असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, नगरसेविकेच्या पतीने इनोव्हा कार रुग्णालयात घुसवली आणि त्यानंतर हातात दगड घेऊन तो उपस्थितांवर भिरकावण्याचा प्रयत्न त्याने केला. VIDEO: नाशकात नगरसेविकेच्या पतीचा राडा; थेट रुग्णालयातच घुसवली कार रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची इनोव्हा कार आतमध्ये नेली आणि तोडफोड केली असे सांगितले जात आहे. अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. घटनास्थळी पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. रुग्णालयात अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडत आहे हे रुग्णालयातील उपस्थितांना प्रथम कळलेत नाही आणि उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला होता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Nashik

    पुढील बातम्या