एकीकडे ऑक्सिजन, बेड्सचा तुडवडा तर दुसरीकडे 100 बेड्सचं रुग्णालय धूळखात

एकीकडे ऑक्सिजन, बेड्सचा तुडवडा तर दुसरीकडे 100 बेड्सचं रुग्णालय धूळखात

फक्त मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याच्या कारणाने हे 100 ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू होऊ शकलेले नाही.

  • Share this:

धुळे, 23 एप्रिल:  धुळे (Dhule) शहरात करोना रुग्णांची (Covid patients) संख्या झपाट्याने वाढत असतनाच प्रशासनातर्फे उपचारासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या महापालिकेने नवीन 100 ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था जुन्या जिल्हा रुग्णालयात (old civil hospital) केली आहे. मात्र, या ठिकाणी सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर (Doctors) आणि अन्य कर्मचारीच उपलब्ध नसल्याने त्या खाटा अजूनही धूळखात पडून (100 beds not in use) असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे रुग्णांना ऑक्सिजनयुक्त खाटा मिळत नसल्याने रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला आहे. तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात कर्मचार्‍यांअभावी तब्बल 100 खाटा रिकाम्या पडून आहेत.

धुळे जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असून दुसरीकडे ऑक्सिजन बेडची देखील मोठी मागणी वाढली आहे. धुळे महापालिका प्रशासनातर्फे जिल्हा रुग्णालयात नव्याने 100 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात आली. मात्र फक्त मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याच्या कारणाने हे 100 ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेड्ससाठी हेलपाटे मारावे लागतायेत. त्याचप्रमाणे महापालिकेने एकूण 210 ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्थाही करुन ठेवली आहे. त्यापैकी 100 खाटा जुन्या जिल्हा रुग्णालयात आहेत. मात्र, या खाटा अजूनही रिकाम्या धूळखात पडल्या आहेत. त्याठिकाणी सर्व साधन सामग्री आणि ऑक्सिजन साठाही उपलब्ध आहे. परंतू, कर्मचार्‍यांच्या अभावी त्या 100 खाटा रिकाम्या पडून असल्याचे विदारक चित्र आहे. त्या ठिकाणी डॉक्टर, परिचारीका आणि अन्य कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.

हृदयद्रावक! विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

या ठिकाणी सेवा देण्यासाठी महापालिकेने दोन वेळा जाहीरात देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. यामुळे खाजगी रुग्णालयातून आवश्यक डॉक्टर आणि कर्मचारी त्या ठिकाणी सेवेसाठी उपलब्ध करुन वेळ निभावून नेण्यात येत आहे. एकीकडे ऑक्सिजनयुक्त खाटा मिळत नसल्याने करोना बाधित रुग्णांसह त्यांचे नातेवाईक भटकंती करीत आहेत. यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला आहे. तर दुसरीकडे जुन्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त 100 खाटा कर्मचार्‍यांअभावी रिकाम्या पडून आहेत. या करीता आता तिसर्‍यांदा महापालिकेने कर्मचारी भरतीसाठी जाहीरात काढली आहे. लवकरच कर्मचारी भरती करुन जुन्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु करण्यात येईल, अशी माहीती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे.

या रुग्णालयात लवकरच कर्मचारी भरती केली जाईल, अशी माहीती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. सध्या धुळे जिल्ह्यात साडेतीन हजाराहून अधिक करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाने तपासणीच्या संख्या वाढविल्याने सकारात्मक रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामध्ये धुळे शहर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे कोरोनाचे हॉटस्पॉट असून सर्वाधिक रुग्ण संख्या शहरात आहे. जिल्हा आणि महापालिका प्रशासनातर्फे विविध ठिकाणी ऑक्सिजनयुक्त आणि व्हेंटिलेटरयुक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठे किती खाटा उपलब्ध आहेत, या बाबतची दररोज समाज माध्यमांवरुन माहितीही प्रसारीत करण्यात येत आहे.

नंदुरबार, शहादा, अंमळनेर येथील रुग्ण उपचारासाठी धुळे शहरात दाखल होत आहेत. त्यांना आम्ही ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध करुन देत आहोत. जुन्या जिल्हा रुग्णालयात महापालिकेने 100 ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था केली आहे. तेथे कर्मचारी नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याकरीता दोन ते तीन वेळा जाहीरात काढून सुध्दा योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. कर्मचार्‍यांअभावी त्या खाटा पडून आहेत. लवकरच त्या ठिकाणी कर्मचारी भरती करुन तेथे रुग्णांवर उपचार सुरु होतील अशी माहिती डॉ.महेश मोरे, आरोग्य अधिकारी, महापालिका धुळे यांनी दिली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 23, 2021, 6:06 PM IST

ताज्या बातम्या