नाशिक, 30 जून: इगतपुरी तालुक्यातील मायदरा-धानोशी गावच्या सरपंच
(Sarpanch) पुष्पा साहेबराव बांबळे या प्रसूती झाल्यानंतर अवघ्या 9 दिवसात आपल्या कर्तव्यावर रुजू
(Back to work after 9 days of giving birth) झाल्या आहेत. त्या आपल्या नऊ दिवसांच्या बाळाला घेऊन ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला
(Monthly Meeting) हजर झाल्या आहेत. अशा अवस्थेत त्या बैठकीला हजर झाल्यानं उपस्थित अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी देखील त्यांचं स्वागत केलं आहे. प्रसूती झाल्यानंतर बांबळे यांना दोन ठिकाणी आईपणाची भूमिका बजवावी लागत आहे.
मायदरा-धानोशी गावच्या सरपंच असणाऱ्या पुष्पा बांबळे यांची नऊ दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. त्यांच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं चिमुकलीनं आगमन केलं. प्रसूतीनंतर आणखी काही दिवस त्यांनी आराम करण्याची आवश्यकता होती. असं असतानाही त्यांनी अवघ्या 9 व्या दिवशी ग्रामपंचायतीच्या बैठकीला हजर झाल्या आहेत. दरम्यान त्यांनी गावातीली पाणी पुरवठा, विजेचा प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामं, शिवार रस्ते आदी प्रश्नांचा आढावा घेतला.
दरम्यान ग्रामसेवक नितीन हेंबाडे, उपसरपंच, चंद्रभागा, बहिरू केवारे आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यानं बांबळे याचं स्वागत केलं होतं. यावेळी बांबळे म्हणाल्या की, सरपंच पदाचा कार्यभार स्विकारताना मी ग्रामस्थांच्या प्रश्नासांठी तत्पर राहिलं असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे गावच्या सरपंच या नात्यानं मी गावातील विविध प्रश्न सोडवण्याठी नऊ दिवसांच्या बाळासह मी बैठकीला उपस्थित राहिले आहे. आणि हे माझं कर्तव्यचं आहे, असं मत पुष्पा बांबळे यांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा-मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसण्यावरून हमरीतुमरी; मारहाणीत शिक्षकाचे पाडले दात
त्यांच्या जिद्दीचं गावकऱ्यांकडून तोंडभरून कौतुक केलं जात आहे. तसेच गावच्या हिताचा विचार करणाऱ्या सरपंच लाभल्यानं गावकरीही खूश आहेत. सरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून त्यांनी जबाबदारीनं आपली भूमिका पार पाडली आहे, असंही गावकऱ्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.