Home /News /nashik /

100 रुपयाचा वाद, टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण, VIDEO

100 रुपयाचा वाद, टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण, VIDEO

या घटनेत महिला कर्मचारी दोषी असल्याच्या आढळून आल्या असून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे'

    फास्टॅगचं अकाऊंट Unblcok करणं पडलं महागातनाशिक, 13 जून: नाशिकमधील (Nashik) पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील (pimpalgaon baswant toll plaza) महिला कर्मचारी आणि प्रवाशी तरुणीमध्ये फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 100 रुपयांच्या नोटीवरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टोल कर्मचारी महिलेला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. पिंपळगाव टोल प्लाझावर सटाणा येथील एका महिलेला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेचा पिंपळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या घटना टोल प्लाझा वर दिवसेंदिवस वाढत असून या कर्मचारी वर्गावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही घटना दहा दिवसांपूर्वीची आहे. 100 रुपयांची नोट बदलण्यावरून कर्मचारी आणि या महिलेमध्ये वाद झाला होता. सदरील महिला कारमधून खाली उतरली आणि तिने जाब विचारला. यावरून दोघींमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. या घटनेत आमची महिला कर्मचारी दोषी असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकले आहे, अशी माहिती टोल प्लाझा मॅनेजर योगेश सिंग यांनी दिली आहे. फास्टॅगचं अकाऊंट Unblcok करणं पडलं महागात पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा हा राष्ट्रीय महाराष्ट्र 3 वरील महत्वाचा टोल प्लाझा असून कर्मचारी वर्गाने वाहनधारक यांच्याशी योग्य वागणूक करावी, अशी मागणी केली जात आहे. तसंच,  याविषयी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेनं केली आहे. अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या