मराठी बातम्या /बातम्या /nashik /

'मेरा बंगाल नही दूंगी' म्हणत झाशीच्या राणीसारख्या लढल्या दीदी; भुजबळांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

'मेरा बंगाल नही दूंगी' म्हणत झाशीच्या राणीसारख्या लढल्या दीदी; भुजबळांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

  • Published by:  Sunil Desale
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 2 मे: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (West Bengal Assembly Election Result) आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना यश आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. ममता दीदींच्या या यशानंतर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही ममता दीदींचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. छगन भुजबळ यांनी म्हटलं, "पश्चिम बंगालमध्ये भाजपने आणि खास करुन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी प्रचंड ताकद लावली. जवळपास दिवसाआड सभा होत होत्या. केंद्रातील 8 ते 10 मंत्री पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. ममता बॅनर्जी एकट्या आणि हे इतके जण अशी ही लढाई होती. पण जशा झाशीच्या राणी म्हणाल्या होत्या मै मेरी झांशी नही दूंगी तसं ममता बॅनर्जींनी सुद्धा मेरा बंगाल नही दूंगी असं म्हणत लढल्या आणि प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्या". ममता बॅनर्जी नंदीग्राममधून 1200 मतांनी जिंकल्या, सुवेंद्र अधिकारी पराभूत तमिळनाडूमध्ये एआयडीएमकेला सपोर्ट केला होता भाजपने मात्र डीएमकेला बहुमत मिळताना दिसत आहे. पुदुच्चेरीत अद्याप चित्र स्पष्ट नाहीये. केरळमध्ये भाजप कुठेही दिसत नाहीये. केवळ आसामध्ये त्यांनी आपल्या जागा राखल्या आहेत. आसाम सोडलं तर सर्व ठिकाणी मतदारांनी भाजपला नाकारलं आहे असं भुजबळांनी म्हटलं. छगन भुजबळांनी पुढे म्हटलं, बंगाल पण गेला आणि कोरोना पण वाढला आहे. इतकं लक्ष देशभरात दिलं असतं तर निदान अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. आजच्या परिस्थितीत जर निवडणुका झाल्या असत्या तर भाजप नावालाही कुठे दिसली नसती. देशभरात भाजपच्या विरोधात लाट आहे.
First published:

Tags: Assembly Election 2021, Mamata banerjee

पुढील बातम्या