मराठी बातम्या /बातम्या /nashik /

आयकर विभागाने 100 कोटी जप्त केले का? भुजबळांनी काढली सोमय्यांच्या दाव्यातून हवा!

आयकर विभागाने 100 कोटी जप्त केले का? भुजबळांनी काढली सोमय्यांच्या दाव्यातून हवा!

'उगाच शिळ्या कढीला ऊत आणायचं कारण नाही, आम्ही कोर्टात जे आहे ते सांगतोय'

'उगाच शिळ्या कढीला ऊत आणायचं कारण नाही, आम्ही कोर्टात जे आहे ते सांगतोय'

'उगाच शिळ्या कढीला ऊत आणायचं कारण नाही, आम्ही कोर्टात जे आहे ते सांगतोय'

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 04 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकारच्या (mva goverment) मंत्री आणि आमदारांवर ईडी (ed) अथवा आयकर विभागाकडून कारवाई होता.  राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जप्त (100 Crore Rupees property seized) करण्यात आल्याचे वृत्त आले होते. पण, अशी कोणतीही कारवाई केली नाही, याचा खुलासा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. तसंच, 'काही लोकांना काम नसतं म्हणून हे उद्योग करतात' असं म्हणत भुजबळांनी सोमय्यांना टोला लगावला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

'महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. प्रत्येक ठिकाणच्या केसेस सुरू आहेत. उगाच शिळ्या कढीला ऊत आणायचं कारण नाही, आम्ही कोर्टात जे आहे ते सांगतोय. निवडणूक आल्या, कोर्टात केस सुरू आहे म्हणून की काहीच कामधंदा नाही म्हणून हे सुरू आहे का हे बघावं लागेल' असं भुजबळ म्हणाले.

अजबच! 40 वर्षांपासून एक मिनिटही झोपली नाही ही महिला; आज आहे अशी अवस्था

तसंच, काही लोकांना काम नसंत म्हणून हे उद्योग करतात. आयकर विभागाने आमच्यावर सध्या कोणतीही कारवाई केलेली नाही. कोणतीही संपत्ती जप्त केली नाही. असं म्हणत समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांची 100 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे वृत्त भुजबळांनी फेटाळून लावलं.

अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

तसंच, राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा लवकरच सुटणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. पण, राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे यांची नाव कट होतील, ही चर्चा कुठून आली मला माहिती नाही, असंही भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डाटा कसा गोळा करता येईल याची माहिती आम्ही घेतो आहोत. एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाता कामा नये अशी अट आहे. इंपेरिकल डाटा यायला वेळ लागत असेल, तर निवडणुका पुढे ढकलण्याबाबत सरकार विचार करू शकेल, असे संकेतही भुजबळांनी दिले.

परप्रांतीयांना आरक्षणाचा देण्याचा मुद्या समोर आला आहे.  पण, नियमांनुसार,  जो जिथे राहतो, तिथे आरक्षण मिळतंय. परप्रांतीयांना जिथे राहतात, तिथे आरक्षण मिळतंय, असंही भुजबळांनी सांगितलं

1 ऑक्टोबरपासून 12 तास करावं लागणार काम; ओव्हरटाइम-PF मध्ये होणार बदल?

'महाराष्ट्रात तीन पक्षांचे पक्षाचे सरकार आहे पण ज्याचा मुख्यमंत्री असतो त्याचंच सरकार असते. ठाकरे सरकार! ठीक आहे सगळे आपले आहेत. पवारसाहेब तर आपलेच आहेत आणि असतील, आहेत. पण  शिवसेना सर्वात वर आहे.शि वसेनेची गरज सर्वांना लागते' असं संजय राऊत म्हणाले होते. याबद्दल भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, 'सगळ्यांच्यावर तिन्ही पक्षांचे श्रेष्ठ नेते आहे, ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य आहे.' असं म्हणत भुजबळांना राऊत यांना टोला लगावला.

First published:

Tags: Chagan bhujbal, छगन भुजबळ