Dhule Zilla Parishad Election Result LIVE: धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीनं राखला गड, महाविकास आघाडीला झटका

Dhule Zilla Parishad Election Result LIVE: धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीनं राखला गड, महाविकास आघाडीला झटका

धरती देवरे भाजप, (लामकानी गट) धरती देवरे ह्या गेल्या वेळेस बिनविरोध झाल्या होत्या यावेळेस मात्र आघाडी ने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे.

  • Share this:

धुळे, 06 ऑक्टोबर: धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे. भाजपच्या धरती देवरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झटका दिला आहे. लामकाणी गटात भाजपची विजयी सलामी नोंद झाली आहे. भाजपच्या धरती देवरे विजयी झाल्या आहेत. 4296 मतांनी धरती देवरे यांचा विजय झाला आहे. लामकाणी गटात भाजपची निर्विवाद सरशी झाल्याचं चित्र आहे.

गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. यावेळी धरती देवरे यांच्यासमोर महाविकास आघाडीचं कडवं आव्हान देण्यात आलं. देवरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना पाटील यांचा धक्कादायक पराभव केला आहे.

धरती देवरे लामकाणी गटातून भाजपकडून निवडणूक लढवली. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत.

धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट व पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक

15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक

-जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच प्रमुख लढत

- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आली असून आघाडी ने एकत्रित उमेद्वार दिले आहेत.

- कुसूंबा गट वगळता सर्व गटात महाविकासची आघाडी आहे.

- कुसूंबा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी सह शिवसेनेने देखील आपला उमेदवार दिला आहे.

ओबीसी उमेदवार किती उभे रहाणार ?

- भाजपने सर्व जागांवर OBC उमेदवार दिले आहेत.

- काँग्रेस - 7 जागांवर उमेदवार

- शिवसेना- 04 जागांवर

- राष्ट्रवादी- 04 जागांवर

कोणत्या पक्षानं किती महिला उमेदवार

-भाजप ने 8 महिला उमेदवार दिल्या आहेत.

-महाविकास आघाडी ने 9 जागांवर उमेदवार

गेल्या अनेक वर्षांपासून काँगेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजप ने बहुमताने सत्ता काबीज केली आहे.

गेल्या वेळचं चित्र काय होतं ?

-गेल्या निवडणुकीत 15 पैकी 11 जागांवर भाजप चे उमेदवार निवडणून आले होते तर काँग्रेसच्या 2 तर शिवसेनेच्या 2 जागा होत्या.

-यावेळेस सारख गेल्या निवडणुकीत महाआघाडी एकत्र लढली होती मात्र पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला बसला आहे.

-दरम्यान यावेळेस भाजप च्या जागा वाढतात की घटतात हे पाहावे लागणार आहे.

First published: October 6, 2021, 10:56 AM IST

ताज्या बातम्या