'माझ्या पप्पांना बेड मिळालाच नाही, रिक्षातच सोडले प्राण', नाशकातील मन हेलावून टाकणारी घटना

'माझ्या पप्पांना बेड मिळालाच नाही, रिक्षातच सोडले प्राण', नाशकातील मन हेलावून टाकणारी घटना

वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या मुलीने शर्थीचे प्रयत्न केले. सुरुवातीला सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण

  • Share this:

नाशिक, 10 मे: नाशिकमध्ये (Nashik corona cases) कोरोनाने थैमान घातले आहे. सर्व रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी फरफट होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बेड तर मिळत नाही पण इतर आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना रुग्णांही बेड मिळत नाही. अशातच एका व्यक्तीला रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे रिक्षातच प्राण सोडून दिल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

नाशिकमधील लेखानगर भागात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. नंदू सोनवणे असं मृत रुग्णाचे नाव आहे. नंदू सोनवणे हे पालिकेचे सफाई कर्मचारी होते. सिडको विभागात ते कार्यरत होते.  काही दिवसांपूर्वी कॅन्सरचं निदान झाल्यामुळे ते रजेवर होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अचानक प्रकृती खालावली. सोनवणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय  घेण्यात आला.

संतापजनक! कोरोनाच्या भीतीनं घरमालकानं कोविड वॉरियर्स तरुणींना काढलं घराबाहेर

वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या मुलीने शर्थीचे प्रयत्न केले. सुरुवातीला सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तिथून लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पाठवलं पण तिथे गेल्यावर सुविधा रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिन्ही ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाले नाही.

शेवटी नंदू सोनवण यांना शिबीर इथं नेण्यात आलं पण तिथेही नाही सांगण्यात आले. अखेर रिक्षातच नंदू सोनवणे यांनी एका खासगी रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले, अशी माहिती त्यांच्या मुलीने दिले, हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

कुमुदिनी यांच्या अंत्यसंस्कारावरुन भय्यू महाराजांच्या मुलगी आणि पत्नीमध्ये वाद

नंदू सोनवणे हे कॅन्सरग्रस्त होते. त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती, असं असतानाही त्यांना कोणत्याही रुग्णालयात बेड मिळू शकला नाही. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीने धावपळ केली. नंदू सोनवणे यांच्या निधनामुळे सोनवणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: sachin Salve
First published: May 10, 2021, 12:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या