Home /News /nashik /

कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे, या पालिकेने घेतला मोठा निर्णय

कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर दाखल होणार गुन्हे, या पालिकेने घेतला मोठा निर्णय

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी करण्याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने असा निर्णय घेतला आहे की, नाशिकच्या कोव्हिड रुगणालयांमध्ये रुग्णांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. अनेक कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते. यामुळे संक्रमणाचा धोका अधिक आहे. हे लक्षात घेताल पालिकेने हा निर्णय घेतला आहे. (हे वाचा-PPE किट घालून अखेर लग्न उरकलंच! नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट होता Positive) नाशिकमध्ये कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना जेवण देण्यासाठी त्याचप्रमाणे इतर कारणांसाठी नातेवाईक रुग्णांना भेटतात, हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर (Super Spreader) म्हणून काम करत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्थात या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होते आणि त्यामुळे शहरात कोरोनाचे संक्रमण वाढते. किंवा हे नातेवाईक विषाणूसाठी कॅरिअर म्हणून काम करतात आणि त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढते. पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या निर्देशानुसार, सुरुवातीला 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार, दंड आकारल्यानंतरही नातेवाईकांनी रुग्णांना भेट देणे सुरूच ठेवले तर थेट गुन्हा दाखल केले जाणार आहेत. शहरात झाकीर हुसेन, बिटको रुग्णालय याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांकडून गर्दी केली जाते, त्यातून संक्रमण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (हे वाचा-भाजप पुरस्कृत नगरसेविकेच्या मुलाला अटक, Remdesivir च्या काळाबाजारात झाली कारवाई) आयुक्तांनी असे आदेश दिले आहेत की संबंधित पोलीस स्टेशनचे इनचार्ज आणि विभागीय अधिकाऱ्यांनी या हॉस्पिटल्समध्ये भेट द्यावी. रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या जेवण आणून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन त्यांनी केल आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येतून काहीसा दिलासा नाशिकमध्ये सोमवारी नवीन कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली होती तर बरे होण्याची टक्केवारी देखील लक्षणीय वाढली होती. सोमवारी जिल्ह्यामध्ये दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 3683 रुग्णांनी झाली वाढ झाली असून 4382 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सोमवारी दिवसभरात 34 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची आकडेवारी 3 हजार 345 वर गेली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातही लक्षणीय सुधार पाहायला मिळाला तरी नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) कायम आहे. शहरात दिवसभरात 2014 नवे बाधित आढळून आले तर 9 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Coronavirus

पुढील बातम्या