मराठी बातम्या /बातम्या /nashik /

पुढील वर्षीचं मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं; स्वातंत्र्य लढ्याचा मोठा वारसा असलेल्या भूमीवर जागर

पुढील वर्षीचं मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं; स्वातंत्र्य लढ्याचा मोठा वारसा असलेल्या भूमीवर जागर

आज कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याचा पुढील वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख आणि ठिकाण ठरवण्यात आलं.

आज कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याचा पुढील वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख आणि ठिकाण ठरवण्यात आलं.

आज कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याचा पुढील वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख आणि ठिकाण ठरवण्यात आलं.

  • Published by:  Meenal Gangurde
नाशिक, 5 डिसेंबर : आज नाशिक (Nashik News) येथील अखिल मराठी साहित्य संमेलनाची  (akhil bharatiya marathi sahitya sammelan 2021) सांगता करण्यात आली. यावेळी शेवटच्या कार्यक्रमात अनेक ठरावही मांडण्यात आले. पुढील वर्षीच्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यांनी 22 नोव्हेंबरला येथील स्थळाची पाहणी केली असून 2022 च्या मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साहित्य संमेलन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उदयगिरी महाविद्यालयात संमेलन होणार आहे. 60 वर्षांपूर्वी झालेल्या महाविद्यालयाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. तर लातूर जिल्ह्यात, पहिल्यांदाच साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश सीमेवरील, महाराष्ट्राच्या अखेरच्या गावात पुढील साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. डॉ. के एन देशमुख, डॉ नारायण नायडोळे, प्राचार्य कृष्णचंद्र न्याते या साहित्यिकांची उदगीर ही कर्मभूमी आहे. तर स्वातंत्र्यलढ्याच्या मोठा वारसा असलेल्या भूमीवर पुढील वर्षी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समारोप कार्यक्रम ठराव - हे ही वाचा-नाशिकमध्ये असूनही देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात जाणार नाहीत, कारण... - साहित्य, कला, संस्कृती, समाजकारण, कोरोना बळींना श्रद्धांजली - नैसर्गिक आपत्ती मुळे गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे,केंद्र आणि राज्य सरकारने या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी,साहित्यिकही सर्वतोपरी मदत करणार. - मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा,राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. - मराठी भाषिक शाळा बंद पडताय, राज्य सरकारनं उदासीनता झटकून सकारात्मक प्रतिसाद करून शाळा सुरू व्हाव्यात. - कर्नाटक सरकार मराठीची गळचेपी करतंय, त्यांच्या धोरणाचा हे संमेलन निषेध करीत आहे. - भाषाविषयक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा ही मागणी. - राज्यात सरकारने स्थापन केलेली परिचय केंद्र नामशेष झाली आहे, गोवा आणी राज्यात अशा केंद्रांची नेमणूक करावी. - राज्यात 60 बोली भाषा,या भाषांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने कृती कार्यक्रम आखावा.
First published:

Tags: Latur, Marathi language, Nashik

पुढील बातम्या