मराठी बातम्या /बातम्या /nashik /

देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, व्हिडिओ व्हायरल होताच 5 जणांविरोधात तक्रार दाखल

देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं, व्हिडिओ व्हायरल होताच 5 जणांविरोधात तक्रार दाखल

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस (Nashik Road Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नाशिक 02 मे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं पाच जणांना चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक रोड पोलीस (Nashik Road Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कोरोना (Corona) सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. दोन दिवसांपूर्वी फडणवीस बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना स्थितीबाबत आढावा घेत असताना ही घटना घडली होती . यानंतर याबाबत नाशिक रोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काय होतं ? या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत चुकीच्या भाषेचा वापर केल्याच आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 'मी शहरात राहिलो असतो तर तुम्हाला बघून घेतले असते.' अशा शब्दांत संकेत भोसले याने गिरीश महाजन यांना उद्देशून फेसबुक अकाऊंटवरून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. सोबतच यात देवेंद्र फडणवीस यांनाही मारण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. हा प्रकार निदर्शनास येताच भाजपच्या पदाधिका-यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. तसंच संशयितांवर कठोर कारवाईची मागणीही केली. याबाबत पुढील तपास पोलीस सध्या करत आहेत.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Nashik, Video

पुढील बातम्या