Home /News /nashik /

Nashik: पोलीस आयुक्तांनी जपलं माणुसकीचं नातं; फुलविक्रेत्या महिलेच्या अंत्यसंस्काराला जात केलं सांत्वन

Nashik: पोलीस आयुक्तांनी जपलं माणुसकीचं नातं; फुलविक्रेत्या महिलेच्या अंत्यसंस्काराला जात केलं सांत्वन

नाशिक (Nashik) शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Commissioner of Police deepak pandey) यांनी सातापूर परिसरातील कोळीवाड्यात राहणाऱ्या फुल विक्रेत्या महिलेच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली आहे.

    नाशिक, 03 जानेवारी: रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं श्रेष्ठ मानलं जातं. असंच माणुसकीचं नातं जपणारी एक घटना नाशिक जिल्ह्यातील सातापूर याठिकाणी घडली आहे. नाशिक (Nashik) शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Commissioner of Police deepak pandey) यांनी सातापूर परिसरातील कोळीवाड्यात राहणाऱ्या फुल विक्रेत्या महिलेच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावून त्यांच्या मुलाचं सांत्वन (Attended funeral of florist woman) केलं आहे. एका फुलविक्रेत्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी पोलीस आयुक्ताने हजेरी लावल्यानं नातेवाईकांना गहिवरून आलं आहे. यावेळी मृत महिलेच्या मुलानं पाण्डेय यांच्या गळ्यात पडून अश्रूंना मोकळी वाट करून दिली आहे. जिजाबाई रामदास पुराणे असं मृत पावलेल्या 65 वर्षीय फुलविक्रेत्या महिलेचं नाव आहे. त्या सातापूर येथील शिवाजीनगर परिसराती कोळीवाड्यातील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिजाबाई आजारी होत्या. शुक्रवारी रात्री त्याचं अचानक निधन झालं. निधनाची बातमी कळताच नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी जिजाबाई यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावून त्यांचा मुलगा विजय याचं सांत्वन केलं आहे. हेही वाचा-डॉक्टर होण्याचं स्वप्न अधूरं सोडून श्रुतीचं टोकाचं पाऊल, नाशिक हळहळलं खरंतर, महात्मानगर परिसरात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचं शासकीय निवासस्थान आहे. याच भागात एका रस्त्यालगत मृत जिजाबाई यांचा फुलविक्रीचा छोटासा व्यवसाय होता. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय दररोज सकाळी देवपूजेसाठी जिजाबाई यांच्याकडून फुलं घेऊन जात होते. यातूनच वयोवृद्ध जिजाबाई यांच्यासोबत पोलीस आयुक्ताचं ऋणानुबंध तयार झाले होते. ते फुलं न्यायला आल्यानंतर पाण्डेय त्यांची प्रेमाने चौकशी करायचे. पण काही दिवसांपासून त्या फुलं विक्रीसाठी येत नव्हत्या. त्याऐवजी त्यांचा मुलगा विजय फुलं विकत असल्याचं पाण्डेय यांना दिसलं. हेही वाचा- 'आई, मला माफ कर...' सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या, नाशकातील खळबळजनक घटना यावेळी पाण्डेय यांनी विजयकडे चौकशी केली असता जिजाबाई यांची प्रकृती खराब असल्याचं त्यांना कळालं. जिजाबाई यांची प्रकृती खराब असल्याचं कळताच पाण्डेय यांनी वेळ न दवडता आपल्या शासकीय वाहनातून कोळीवाडा गाठत जिजाबाई यांची भेट घेतली. अर्धा-एक तास घरी थांबून त्यांनी जिजाबाईंच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच आर्थिक खर्चाची काळजी करू नका असा आधार देत कुटुंबीयांशी संवाद साधला. हेही वाचा- वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखलं; मुलींनीच आईला दिला खांदा, कारण वाचून पाणवतील डोळे यानंतर शुक्रवारी रात्री अचानक जिजाबाई यांचं निधन झालं. निधनाची बातमी कळताच पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी कोळीवाड्यात जाऊन जिजाबाई यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. यावेळी जिजाबाई यांचा मुलगा विजय यानं पाण्डेय यांच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. कोणतंही रक्ताचं नातं नसताना, केवळ माणुसकीच्या नात्याने पोलीस आयुक्त अंत्यसंस्काराला आल्याचं पाहून अनेकांना गहिवरून आलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Emotional, Nashik

    पुढील बातम्या